लोकनेता न्युज नेटवर्क
उस्माननगर (गणेश लोखंडे) :- पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंचोली ता.लोहा शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून विनापरवाना अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या धर्माकाॅलचे तराफे नष्ट करून पाच जणासह पाच लोखंडी छोटे इंजिन व बारा धर्माकाॅलचे तरफे असा एकुण २३, ५०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात उस्माननगर पोलिस स्टेशन व महसूल पथकाची संयुक्तपणे कारवाई करण्यात आली.
मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी "ऑपरेशन फ्लश आऊट" अंर्तगत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रेतीचा चोरटा उपसा करुन वाहतुक व विक्री करणारे इसमाविरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन उस्माननगर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संजय निलपत्रेवार हे पोलीस स्टेशन उस्माननगर येथील वर नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह पेट्रोलींग करीत असताना गुप्तबातमीदारमार्फत गोपनीय माहीती मिळाली की, मौजे चिचोली, ता.लोहा शिवारातील गोदावरी नदीचे पात्रात काही इसम विनापरवाना लोखंडी इंजीन व थर्माकॉलच्या तराफ्याचे सहाय्याने गोदावरी नदी पात्रातुन रेतीचा (गौण खनिज) अवैध्य रित्या उपसा करीत आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने महसुल विभागाचे अधिकारी यांचे सह सदर ठिकाणी छापा मारला असता वर नमुद 05 लोखंडी छोटे इंजीन व 12 थर्माकॉलचे तराफे असा एकुण किमंती 23,50,000/-रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. त्यानंतर महसुल विभागाचे सजा मंडळ अधिकारी शिवकांता पवार व ग्राम महसुल अधिकारी मोतीराम पवार यांनी कळविले की, सदर इंजीन व थर्माकॉलचे तराफे यांनी शासनाची परवानगी घेतलेली नाही. सदरील रेतीचा अवैध उपसा करीत असल्याची खात्री झाल्याने त्याबाबत सजा मंडल अधिकारी शिवकांता पवार व ग्राम महसुल अधिकारी मोतीराम पवार यांनी सदर साहीत्याचा पंचासमक्ष रितसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट केला आहे. त्यानंतर सदर इंजीन व तराफे मालकांची माहीती घेवुन त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन उस्माननगर येथे नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्माननगर पोलीस पथकाने अवैध रेती उपसा करणारे इसमांवर कारवाई करुन उत्कृष्ठ कामगीरी केल्याने मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment