देगलूर महाविद्यालयात क्रीडा ज्योत मशाल रॅलीचे स्वागत.


लोकनेता न्युज नेटवर्क

देगलूर (अमोल कुमार शिंदे) :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड क्रीडा महोत्सवानिमित्त क्रीडा ज्योत मशाल रॅलीचे आगमन झाले. या क्रीड़ा ज्योत मशाल रैलीचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन खताळ यांनी केले व नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र या अभियान अंतर्गत नशामुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठाचे संचालक तथा देगलूर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.मारोती गायकवाड व उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार,उपप्राचार्य डॉ. व्यंकट शेरीकर, कार्यालयीन अधीक्षक मा.गोविंद जोशी डॉ.राजेश्वर दुडूकनाळे व कार्यक्रमाधिकारी डॉ.व्यंकट खंदकुरे, प्रा.गणेश क्यादारे,प्रा. शिवचरण गुरुडे,डॉ.विठ्ठल जंबाले,डॉ.रत्नाकर लक्षटे,डॉ. ‌संतोष येरावार, डॉ.माधव चोले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments