इंजिनिअर चंद्रकांत पाटील घरकुलाची फोटो काढण्यासाठी करतोय पैशाची मागणी सौ.कालीदाताई गोविंदराव शिंदे यांनी केली बिडीओ व सीईओ यांच्या कडे इंजिनिअर वर कारवाई करण्याची मागणी


लोकनेता न्युज नेटवर्क

कंधार (प्रतिनिधी) :- पेठवडज सर्कल मध्ये घरकुल योजनेत इंजिनियर चंद्रकांत पाटील घरकुलाची फोटो काढण्यासाठी पाच हजार, सात हजार, दहा हजार रुपयाची मागणी करत आहेत.असे पेठवडज सर्कल मधील नागरिकांनी माजी पंचायत समिती सदस्या सौ कालींदाताई गोविंदराव शिंदे यांना फोन करून नागरीक सांगत आहेत इंजिनियर चंद्रकांत पाटील घरकुलाची फोटो काढण्यासाठी पैशाची मागणी करत असून पैसे नाही दिले तर बिल दाखल करीत नाहीत.फोटो पुढे पाठवत नाही.त्यामुळे माजी पंचायत समिती सदस्या सौ कालींदाताई गोविंदराव शिंदे यांनी बिडीओ व सीईओ यांच्या कडे इंजिनिअर वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच नागरिकांनी इंजिनियर ने पैसे मागितले तर माझ्या सोबत संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.तसेच गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे इंजिनिअर वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments