तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात संख्या रेषेच्या मॉडेलचा प्रथम क्रमांक


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (स्वाती सोनकांबळे) :- ५३ वे विज्ञान प्रदर्शन २०२५ चे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन टायनी एंजल्स हायस्कूल पावडेवाडी नाका येथे दिनांक १२ डिसेंबर रोजी पार पडले.

या विज्ञान प्रदर्शनात अद्यापक निर्मित गणित साहित्यात इंदिरा गांधी हायस्कूल चे गणित अद्यापक डॉ. एम. टी. कदम यांच्या संख्या रेषेच्या साह्याने बेरीज, वजाबाकी करणे व एकचल समीकरणे सोडवण्यासाठी संख्यारेषेचा वापर करणे चालत, फिरत, गणित शिका या डॉ. कदम निर्मित मॉडेलचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आला.

जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी या शैक्षणिक साहित्याची निवड झालेली आहे.

 या मॉडेलच्या साह्याने चिन्हांकित संख्यांची बेरीज वजाबाकी करणे सोपे जाणार आहे.

 चिन्हांकित संख्यांच्या बेरीज वजाबाकीची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकणे हा या मॉडेलचा मूळ उद्देश आहे.

 त्यांच्या मॉडेल ला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments