कलंबर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे लोकार्पण करून कायमस्वरूपी निवासी डॉक्टर देण्याची मागणी


लोकनेता न्युज नेटवर्क

लोहा (राजाराम फाजगे) :- युवासेना तालुकाप्रमुख नंदाजी पाटील इंगळे यांच्या वतीने

कलंबर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरूपी निवासी डॉक्टर नियुक्त करण्यात यावा तसेच महिला रुग्णांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीचे प्रलंबित लोकार्पण तत्काळ करण्यात यावे, या मागणीसाठी आज जिल्हा परिषद नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनाची तात्काळ दखल घेत डॉ. संगीता देशमुख मॅडम यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत दोन दिवसांत निवासी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येईल, असा ठोस शब्द दिला. तसेच महिला रुग्णांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण पाणीपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे प्रलंबित असून, लवकरच नळजोडणी करून इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या वेळी तुकाराम पाटील कदम (शेलगावकर), सूरज तेलंगे, नरेश घोरबांड तसेच मित्र परिवार उपस्थित होते. डॉ. संगीता देशमुख मॅडम यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कलंबर परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments