ज्ञानेश्‍वरी ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.


लोकनेता न्युज नेटवर्क

वाघोली (संतोष कदम) :- ज्ञानेश्‍वरी ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चा अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य आणि उत्साहवर्धक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक दिगंबर ढोकले सर,भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कैलास पवार, तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सभागृहातील उपस्थितांची दाद मिळवली. रंगतदार नृत्यस्पर्धा,देशभक्तीपर गीते, नाटिका, कोवळ्या कलावंतांची कला-सादरीकरणे, आणि आधुनिक काळाशी सुसंगत अशा संकल्पनांवर आधारित कार्यक्रमांनी वातावरण रंगले.यावेळी मान्यवरांपैकी प्राध्यापक दिगंबर डोकले सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की 

“अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.मुलांमधील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी स्नेहसंमेलन मोठी भूमिका बजावते.” तसेच भूमी फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले की आजच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक,मानसिक,बौद्धिक,

सामाजिक विकास होणे गरजेचे आहे.कार्यक्रमात भूमी फाउंडेशन कृषक कन्या यांनी देखील आपली कला सादर केली या कलेचा गौरव म्हणून संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ मारकड सचिव आशा मस्के यांनी सदर मुलींचा ट्रॉफी आणि साहित्य वाटप करून सन्मान केला.पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे सातत्य मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम अधिक यशस्वी आणि संस्मरणीय झाला.

शाळेचे संस्थापक जगन्नाथ मारकड सर यांनी मान्यवरांचे हार्दिक आभार मानले व ते म्हणाले की,“ज्ञानेश्‍वरी ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचा उद्देश केवळ शिक्षणपुरता मर्यादित नसून मुलांच्या व्यक्तिमत्त्वविकासाला प्राधान्य देणे हा आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव आशा ताई मारकड यांनी उत्तमरीत्या पार पाडले. यावेळी उपस्थित प्राध्यापक पंढरी अरुण प्राध्यापक दत्तात्रय तापकीर प्राध्यापक दत्तात्रय गावडे प्राध्यापक विजय गावडे प्राध्यापक दत्तात्रय चव्हाण इत्यादी उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments