किनगाव राजा राष्ट्रवादी पार्टी शहराध्यक्षपदी शेख लतिफ कुरेशी यांची निवड



लोकनेता न्यूज नेटवर्क

किनगावराजा (महेश मुंढे) :- किनगाव राजा:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) किनगाव राजा शहराध्यक्षपदी शेख लातिफ कुरेशी यांची निवड करण्यात आली. पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

या निवडीप्रसंगी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ जाधव यांच्यासह सरपंच प्रकाश मुंढे,महेश मुंढे रवी काळुसे, विष्णू मांटे, पंढरीनाथ काकड, ज्ञानेश्वर झोरे, फारूक कुरेशी, अल्ताफ कुरेशी,साबिर शेख, शेरू शेख, हाफिज कुरेशी, वसीम कुरेशी, दानिश कुरेशी, इमरोज,मुन्ना शेख, धीरज खरारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी शेख लातिफ कुरेशी यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वाखाली किनगाव राजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाच्या ध्येयधोरणांना तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

निवडीनंतर शेख लातिफ कुरेशी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, शहरातील युवक, शेतकरी व सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments