लोकनेता न्यूज नेटवर्क
सेनगाव (महादेव हारण) :- सेनगाव तालुक्यातील उमरदरी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाचा सेनगाव पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली असून
या धडक कारवाईत नोंदणी नसलेली जेसीबी मशीन व सुमारे ५ ब्रास वाळू असा एकूण ₹२०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई १७ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. आरोपी उचित उत्तमराव कुंदर्गे (रा. कवरदरी) हा कोणतीही शासकीय परवानगी न घेता व महसूल बुडवून वाळू उत्खनन करताना आढळून आला. मात्र, पोलीस व महसूल पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपीने पळ काढला.या प्रकरणी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १८/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच गौण खनिज कायदा कलम ४८(७)(८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक साहेबराव मस्के यांनी दिली आहे.कारवाईदरम्यान ई-पुरावे संकलित करण्यात आले असून आरोपी सध्या फरार आहे. पोलीस तपास वेगाने सुरू असून अवैध वाळू माफियांविरोधात कडक कारवाईचे संकेत या घटनेमुळे स्पष्ट झाले आहेत.ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सेनगाव पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक मस्के, PSI रवीकिरण खंदारे, HC वंजारे, HC थिटे, PC खोकले, चालक क्षीरसागर तसेच महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री. कारगुडे, श्री अंभोरे, मंडळ अधिकारी श्री. इंगळे व तलाठी रोडगे यांनी सहभाग घेतला.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment