लोकनेता न्युज नेटवर्क
मुदखेड (सदानंद शिंदे) :- मुदखेड तालुक्यातील दरेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन दि.१७ जानेवारी रोजी करण्यात आले होते.विद्यार्थी दशेत लहान-लहान विद्यार्थी शिकत असताना खुप साऱ्या अडचणी असतात पण विद्यार्थी हे भौतिक,शैक्षणिक वातावरणात घडत असतात.बालवयात विद्यार्थी हे मातीच्या चिखलासारखे असतात. त्यांना योग्य वळण मिळाल्यास ते आपल्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात ऊतरवू शकतात. शिक्षक हे विद्यार्थीना शाळेच्या वेळेत शिकविन्या बरोबरच योग्य वळण आणि मार्गदर्शन करण्याचे काम करतात.तर विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा आपला विद्यार्थी किती अभ्यास करतो,त्याची अभ्यासाच्या बाबतीत प्रगती कशी आहे. तो अभ्यास करतो की नाही याची शाळेत जाऊन चौकशी करणे. वेळोवेळी विचारणा केल्याने विद्यार्थीची अडचण लक्षात येते आणि अडचणीवर मात करता येते याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शालेय व्यवथापन समितीच्या यांच्या समन्वयाने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला दररोज शाळेत पाठवणे आणि आपल्या पाल्याचा अभ्यास घरी घेणे.या मेळाव्याच्या माध्यमातून सर यांनी शाळेच्या विविध अडचणी पालकांसमोर व्यक्त केल्या. तर पालकांनी सुद्धा आपण भौतिक सुविधासाठी लोकवर्गणी च्या माध्यमातुन हातभार लावु असे सांगितले.शिक्षकांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली. या पालक मेळाव्याला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास शिंदे, सरपंच सौ.अनुसया जकोजी माचनवाड,गजानन गाढे, विठ्ठल शिंदे,सुनील एडके, पप्पू कोलते, केरबा कोलते,आनंदा कोलते, रमेश गाढे ,वसंत शिंदे ,किशन नरवाडे, सिध्दार्थ कोलते ,जकोजी माचनवाड ,
श्रीराम माचनवाड,पंढरीनाथ माचनवाड, सुधिर शिंदे, गोविंद गाढे,साहेबराव कोलते, तातेराव गाढे,बालाजी गाढे,भगवान राहेरे,संजय नरवाडे,नागोराव पांचाळ,बाबू कोलते,केशव शिंदे,तसेच माता पालक शिल्पा शिंदे ,विशाखा शिंदे सुनीताबाई कोलते, सुरेखा शिंदे,अस्मिता शिंदे, अंजनाबाई कुरे,गोदावरी नरवाडे, गण्याबाई नरवाडे, सुरेखा अक्कलवाड, गजराबाई गाढे, अनुसयाबाई कोलते, वर्षा कोलते, शिल्पा कोलते,व शाळेचे शिक्षक राऊत सर,कांबळे मॅडम,मंगनाळे मॅडम,मनुरकर सर, कुसुंमकर सर, जाधव सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक, माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी केले.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment