स्त्री जन्म भारतीय संस्कृतीच्या नावाखालील अराजकता


लोकनेता न्यूज नेटवर्क

लेखिका

सौ. उज्वला बालाजीराव गुरसुडकर.

मोबाईल-9764887662.

अराजकता

भारतीय संस्कृतीत स्त्रियांना आपल्या समाजात वावरताना व्यक्ती स्वातंत्र्य मिळाले का....??

   हा प्रश्न थोडा परखड वाटत असेल पण सत्य आहे. स्त्री ला संविधानीक व्यक्ती स्वातंत्र्य आरक्षण मिळाले आहे, पण कौटुंबिक सामाजिक व्यवहारात व्यक्ती स्वातंत्र्य मिळाले नाही. देश स्वतंत्र होऊन अनेक वर्षे उलटून गेली, लोकशाहीचा उदय झाला पण खरंच आजपर्यंत अनेक घटना दिसुन येतात.

ती आजही स्वातंत्र विचार करूं शकत नाही. आपण ज्या भारत भुमी चे घटक आहेत त्या भुमीचा इतिहास पाहिला तर सगळ्यात जास्त स्त्री ला महत्त्व दिला जाणारा देश म्हणून ओळखला जातो, मगं खरंच तसं आहे का...??

        मला वाटत की हे सगळं सामाजिक दृष्ट्या स्पष्ट केले आहे ही अराजकता सामाजिक हुकुमशाही 

 सामाजिक धार्मिक व वैचारिक गोंधळ, जो स्पष्ट दिसत असून त्याचा संस्कृती नावांची चादर पांघरून मनमानी कारभार सुरू आहे. ही गोष्ट कुठल्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही, ज्याला आपण शासनहिनता म्हणूं शकतो....!!

   ऐतिहासिक दृष्ट्या स्पष्ट केले आहे, 

समाज डोळेझाक करून आपल्या संस्कृतीचा नावाखाली अन्याय अत्याचार करण्यात कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवत नाही.

   पुर्वी स्वयंवर नावांची प्रथा राजकीय घराणेशाहीचा वारसा म्हणून दिसत होता. पण वाटते तेवढे सोपे होते का....??

     उदाहरणार्थ आपण द्रोपदी स्वयंवर घेऊयात, त्या गोष्टी चा सखोल विचार केला तर स्वयंवर पद्धतीने द्रोपदी साठी योग्य वर निवडायला अर्जुनाला धनुर्विद्येच्या माध्यमातून परिक्षा उत्तीर्ण करून द्रोपदी मिळवायची होती, आणि ती पुर्ण झाली होती. तरीही पाच पांडवांची आई महाराणी कुंती च्या आदेशाचे पालन करावे लागले म्हणजे काय होते ही एक अराजकता च आहे....!!

    आईच्या आदेशानुसार द्रोपदी ला पांच पांडवांची पत्नी म्हणून स्वीकार करावा लागला. जे की एका स्त्री च्या मनाविरुध्द घेतला गेलेला निर्णय होता, पण हे सगळं होतं तेव्हा कुणीही त्या स्त्रीला विचारले होते का...??

 ह्या प्रश्नाचे उत्तर कुणी तरी विचारला होता का नाही. बस निर्णय घेतला आणि थोपवून दिला....!! 

समाजाला कधीच स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती स्वीकारता येत नाही, कारण समाजाला प्रश्न विचारणारा माणूस नको असतो तर ठरवून दिलेल्या मार्गावर चालणारा कळप हवा असतो...!!

      म्हणूनच जो व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने विचार करतो, अनुभवांवर विश्वास ठेवतो आणि रूढ चौकटींपलीकडे जातो, तो समाजाच्या नजरेत वेडा, वेगळा किंवा अविचारी ठरतो, जसे कळपातील सुंदर पिल्लालाच कुरूप ठरवले जाते, पण प्रत्यक्षात वेडे ते नसतात जे वेगळा विचार करतात, तर ते असतात जे विचार न करता बहुसंख्येच्या मागे चालतात...!!

     प्रत्येक व्यक्तीची धारणा ही तिच्या स्वतःच्या अनुभवावर आधारलेली असते आणि या विश्वात कोणत्याही गोष्टीची पुनरावृत्ती नसल्यामुळे दोन धारणाही कधीच एकसारख्या असू शकत नाहीत, तरीही समाज ‘नसलेल्या बहुसंख्येच्या’ नावाखाली एकच विचार, एकच माप आणि एकच मार्ग सर्वांवर लादतो, ज्यातून सामूहिक हुकूमशाही, अराजक आणि विसंगती निर्माण होते...!!

         मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीला आत्मदर्शन होते, तेव्हा तो कळपातून बाहेर पडतो, मेंढरू राहत नाही तर राजहंस होतो, आणि असे राजहंसच समाजाला खरी दिशा देतात, मानवतेचा अर्थ उलगडवतात , म्हणूनच अशा स्वतंत्र विचार करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तींना ओळखणे, त्यांना समजून घेणे आणि पुढे नेणे हेच खरे समाजप्रबोधन आहे.....!!

 हा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणं योग्य ठरेल का....!!

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments