विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे राष्ट्रीय युवा दिना निमित्त युवकांना अमली पदार्थापासून मुक्तीचा संदेश



लोकनेता न्यूज नेटवर्क

सेनगाव (महादेव हारण):- कोळसा - विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा येथे तालुका विधी समिती सेनगाव व तालुका वकील संघ सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने एक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात युवकांना अमली पदार्थापासून मुक्तता करण्यासाठी (DAWN) योजनेअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षपद तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मा. श्री एस.एस. जयस्वाल साहेब, दिवानी न्यायाधीश 'क' स्तर सेनगाव यांनी भुषविले. त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.प्रमुख वक्ते म्हणून श्री दिपक मस्के साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सेनगाव यांनी सायबर गुन्हे, पोस्को कायद्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब, उपाध्यक्षा सौ. आनंदीताई बेंगाळ, सचिव श्री अंकुशराव बेंगाळ,प्राचार्य अभिषेक भैय्या बेंगाळ उपस्थित होते.

सेनगाव वकील संघातील विधी तज्ञ श्री एम.पी. कांबळे साहेब व श्री यु.व्ही. कोटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते यांनी बालकांना व युवकांना मानसिक स्वास्थ्य चांगले राहायाच्या दृष्टिकोनातून बालकांना योग्य दिशा मिळणे तसेच युवकांना योग्य दिशेने वाटचाल करणे, व्यसण्यापासून दूर राहणे याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास सेनगाव न्यायालयाचे सहअधीक्षक अज्योद्दीन शेख, श्री जी.एस. धर्माधिकारी वरिष्ठ लिपिक, श्री जे.एम. मथ्थे, श्री गणेश रिठे, महादेव खंदारे, मुख्याध्यापक श्री शिंदे आर.बी., श्री सरकटे व्ही.एस. पर्यवेक्षक श्री कसाब पी.पी., तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments