लोकनेता न्युज नेटवर्क
किनगाव जट्टू (प्रतिनिधी) :- किनगाव जट्टू येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने 12 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी साडेसात वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन गावच्या सरपंच शारदा ताई महाजन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच शारदा महाजन ह्या होत्या.यावेळी लहान विद्यार्थिनी जानवी दीपक सानप लक्ष्मी जाधव राजेश नागरे अध्यक्ष फुले शाहूआंबेडकर विचार मंच अमोल पालकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले या नंतर मुलींना व मुलांना शालेय साहित्य पेन वही तसेच खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य मथुराबाई जाधव राजेश नागरे विनोद सातपुते ग्रामविकास अधिकारी .अमोल पालकर राजू जाधव संजय राठोड संजय जाधव सह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/


Post a Comment