दोन वर्षाच्या संघर्षानंतर अखेर पात्र महिलांना न्याय सेनगाव नगरपंचायत हद्दीतील पात्र आशा स्वंयसेविकांना मिळाले नियुक्ती आदेश


लोकनेता न्यूज नेटवर्क

सेनगाव (महादेव हारण) :- सेनगाव नगरपंचायत हद्दीतील रिक्त आशा स्वयंसेविका पद भरतीसाठी सुरु असलेल्या दोन वर्षाच्या प्रदीर्घ संघार्षाला अखेर यश मिळाले आहे.प्रशासनाच्या दिरंगाई,दुर्लक्ष आणि उदासिनता विरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या पात्र महिलांना न्याय मिळाला आहे.दि.७ जानेवारी बुधवार रोजी तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सतिष रुणवाल यांनी नियुक्तीचे आदेश काढले आहेत.नियुक्ती आदेश मिळताच आशा स्वयंसेविका महिलांनी पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.

सेनगाव नगरपंचायतच्या ठरावानुसार सौ.रुखिया परविन मोहसिन सय्यद,सौ.सारीका शुभम तिडके,सौ.विमल शामराव गाढवे,सौ.नंदा प्रकाश तनपुरे आणि सौ.सुनिता देविदास गवळी या पाच महिलांना आशा स्वयंसेविका पदासाठी पात्र ठरविले होते.शासन आदेश,राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सुचना असतांना ही आशा स्वयंसेविका पदाच्या नियुक्त्या मुद्दामहुन थांबविल्या गेल्याचा आरोप करीत वेळोवेळी प्रशासनाला निवेदने सुध्दा दिली.अखेर न्यासाठी महिलांनी दि.११ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा मार्ग स्विकारले.उपोषणाच्या दणक्याने आणि कायदेशीर कारवाईच्या भुमिकेमुळे प्रशासनाला अखेर माघार घ्यावी लागली.तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सतिष रुणवाल यांनी आशा स्वयंसेविका नियुक्तीचे आदेश काढले.सदरचे नियुक्ती आदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या हस्ते महिलांनी स्विकारले आहेत.यावेळी या संपुर्ण संघर्षाला सातत्याने पाठपुरावा करणारे दैनिक लढणारा कलमवीरचे मुख्य संपादक पंडीत अण्णा तिडके उपस्थित होते.नियुक्ती आदेश प्राप्त होताच महिलांनी पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.हा निर्णय केवळ नियुक्ती आदेशापुरता मर्यादीत नसुन,प्रशासनाच्या निष्क्रीयेविरोधात उभ्या राहिलेल्या महिलांच्या हक्कांच्या आणि संविधानिक न्यायाचा स्पष्ट विजय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments