कळका येथिल शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा द्या अन्यथा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढणार


लोकन्याय न्यूज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- मौजे कळका तालुका कंधार येथील शेतीसाठी सध्या रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे ही. अडचण दूर करून शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा पुरवण्यात यावा या मागणीसाठी मौजे कळका येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या उप अभियंता व उपजिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले असून सध्या रब्बी हंगाम जोमात असून पिकांना पाणी देण्यात येत आहे मात्र महावितरण रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांना दिवसांच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री साप इंचू व अन्य विषारी प्राण्यांचा धोका पत्करून पिकांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत आहेत यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत नाईलाजाने रात्री पाणी देण्यासाठी जावे लागते मात्र आमचे हे दरवर्षीचे दुःख दूर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही असे शेतकऱ्यांना दिसून आल्यामुळे आम्ही खालील शेतकरी दिनांक 29 1 2026 पर्यंत आमची मागणी पूर्ण न केल्यास दि.30/1/2026 रोजी कळका ते उपजिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन. जाधव व्यंकटी गोविंदराव लोक आंदोलन न्यास नांदेड जिल्हा सहसचिव. व्‍यंकटी गणपती गायकवाड चेअरमन .कळका शरद शिवाजी गायकवाड .केशव मोहन गायकवाड .वैजनाथ गायकवाड पांडुरंग गायकवाड .मधुकर गायकवाड राजेश गायकवाड .बालाजी गायकवाड, व्यंकटी गायकवाड. शंकर गायकवाड .वैभव गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रशासनाने या मागणीचा गंभीर्यपूर्वक विचार करून त्वरित दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments