लोकनेता न्यूज नेटवर्क
कुंडलवाडी (गंगाधर दुसलवाड) :- कुंडलवाडी येथील अनंत राजेश्वर येरावार यांची BSF सीमा सुरक्षा बल मध्ये यशस्वी निवड झाली असून या यशामुळे कुंडलवाडी शहर व परिसरात आनंदाचे वातावरण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत अनंत यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र गौरव होत आहे.
अनंत यांचे प्राथमिक शिक्षण कुंडलवाडी येथे, माध्यमिक शिक्षण धर्माबाद येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण पानसरे महाविद्यालय, अर्जापूर येथे झाले. त्यांचे वडील स्वाध्याय बंधू व शेतकरी होते. स्वाध्याय परिवाराच्या संस्कारातून प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी व समाजाभिमुख विचार अनंत यांच्या जीवनात रुजले. आर्थिक अडचणी असूनही वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या बळावर अनंत यांनी शिक्षण पूर्ण करून शासकीय सेवेत प्रवेश मिळवला.
येरावार परिवारातील शासकीय नोकरी मिळवणारे अनंत हे पहिलेच युवक असून त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक युवकांना प्रेरणा मिळत आहे. देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल अनंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अनंत येरावार यांच्या या निवडीबद्दल कुंडलवाडी परिसरात नागरिक, मित्रपरिवार व स्वाध्याय परिवाराकडून स्वागत व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वजण सदिच्छा व्यक्त करत आहेत.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment