छत्रपती संभाजीनगर | ज्ञानेश्वर बुधवत :- साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आयोजित 'एकदिवसीय बहुभाषिक राष्ट्रीय साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा २०२६' च्या संमेलन अध्यक्षपदी चिखली येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष मा. डॉ. ॲड. विजयकुमारजी कस्तुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ते केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असून जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने नुकतेच गोवा आणि भंडारा येथील अधिवेशने व पंढरपूर येथील कवी संमेलन गाजविले असून गुजरातच्या सूरत येथे आयोजित कविसंमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून सुध्दा त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
हे भव्य संमेलन येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी केरळ राज्यातील निसर्गरम्य मुन्नार येथील 'स्पाईस जंगल रिसॉर्ट' मध्ये संपन्न होणार आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा सोहळा पार पडणार असून, यामध्ये विविध भाषेतील साहित्यिकांचा सहभाग असणार आहे.
प्रमुख उपस्थिती: या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी डॉ. डी.व्ही. खरात (बुलढाणा), माजी असिस्टंट आर.टी.ओ. मा. गुणवंत गवई आणि ज्येष्ठ कथाकार डॉ. बबन महामुने यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संघर्ष सावळे यांनी केले आहे.
साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण:
डॉ. विजयकुमार कस्तुरे यांच्या प्रदीर्घ साहित्यिक अनुभवामुळे आणि त्यांच्या सामाजिक योगदानामुळे त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल चिखली, बुलढाणा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रहिताच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून हे संमेलन केरळच्या भूमीत मराठी आणि इतर भाषांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.
________________________


Post a Comment