५८ व्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने परिसर झाला विठ्ठलमय नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध
सिंदखेड राजा|प्रतिनिधी :- तालुक्यातील सावखेड तेजन येथे प.पु. सद्गुरू वैकुंठवासी ह.भ.प. श्री संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची (५८ वे वर्ष) मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सांगता झाली.
वै. ह.भ.प. महंत भीमसिंह बाबा यांच्या कृपाप्रसादाने व महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या पवित्र सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
सप्ताहभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण व गाथा भजन, दुपारी शिवमहापुराण, तर सायंकाळी हरिपाठ असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
रात्रीच्या सत्रात नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तन व जागराने संपूर्ण गावाचे वातावरण विठ्ठलमय झाले होते.
नामवंत कीर्तनकारांनी दिली सेवा
या सोहळ्यात ह.भ.प. विठ्ठल महाराज आसोलेकर (छत्रपती संभाजीनगर) यांनी शिवकथा प्रवक्ते म्हणून सेवा दिली.
तसेच सप्ताहात पुढील कीर्तनकारांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला —
ह.भ.प. सतीश महाराज डोईफोडे
ह.भ.प. नाना महाराज कदम
ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाभळे
ह.भ.प. समाधान महाराज शर्मा
ह.भ.प. रामराव महाराज ढोक
ह.भ.प. सोपान महाराज शास्त्री
काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसाद सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ह.भ.प. डॉ. गणेश महाराज बडे (श्री क्षेत्र दुर्गाशक्ती गड) यांचे भावपूर्ण काल्याचे कीर्तन पार पडले.
यानंतर दुपारी ४ ते ६ या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील शेकडो भाविकांनी घेतला.
श्री गणेश दत्तुजी काळुशे यांनी महाप्रसादासाठी अन्नदानाचे आयोजन केले होते.
गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे सोहळा यशस्वी
हा पवित्र सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त गावकरी, संत भगवानबाबा स्वयंसेवक मंडळ, सावखेड तेजन भजनी मंडळ, तसेच परिसरातील टाळकरी व गायनाचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
५८ व्या वर्षातील या अखंड हरिनाम सप्ताहाने सावखेड तेजन परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले.
________________________



Post a Comment