आदर्श विद्यालय सिंदखेड राजा येथे स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन संपन्न
लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा :- स्थानिक आदर्श मराठी प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदीर आणि आदर्श कॉन्व्हेन्ट ज्ञानपीठ,सिंदखेड राजा येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.रामकृष्ण दादा शेटे यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श विद्यालय व आदर्श कॉन्व्हेन्ट ज्ञानपीठ येथील तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमाला व्यासपीठावर स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून मा.श्री.सौरभ तायडे लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगर परिषद, सिं.राजा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. तुषारजी डोडीया बी.ई.कॉम्प्यु.गोल्ड मेडलिस्ट हे होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा.श्री.सहदेवजी सुरडकर, मा.श्री.अरविंदजी शिंगणे,मा.श्री. अशोकभाऊ कोटेचा, स्थानिक सल्लागार असलेले मा.श्री.छगन दादा मेहेत्रे, मा.श्री.अनंतराव खेकाळे, मा.श्री.प्रकाशराव वायकोस, मा.श्री.शिवप्रसादजी ठाकरे, मा.श्री.दिलीपजी काळे, मा.श्री.काशिनाथराव भालेराव, मा.श्री.तुळशीदासजी चौधरी, मा.श्री.रामभाऊ आढाव तसेच नगरपरिषदेचे नगरसेवक श्रीमती.सिंधुताई ठाकरे, सौ.पौर्णिमाताई भुसारे, सौ.सोनाली मेहेत्रे,श्री.कृष्णा मेहेत्रे, श्री.संतोष मेहेत्रे, ऍड.संदीप मेहेत्रे व डॉ.कृष्णा काळे शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष मोरे सर, आदर्श कॉन्व्हेन्ट च्या मुख्यद्यापिका सौ.भाग्यश्री जायभाये मॅडम, माध्यमिकचे प्र.मुख्याध्यापक श्री.संदीप चौधरी सर, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी देवी सरस्वती, मां जिजाऊसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉन्व्हेन्टच्या मुख्यध्यापिका सौ.जायभाये मॅडम यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी उद्घाटनपर भाषणांमध्ये मी आदर्श विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून या विद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमामध्ये मी सहभाग नोंदवला असून याचा मला सार्थ अभिमान आहे,असे सांगितले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.रामकृष्ण दादा शेटे आपल्या अध्यक्षीय भाषणांत बोलतांना म्हणाले की, स्नेह संमेलन म्हणजे विद्यार्थी,पालक व शिक्षक एकत्र यावे व आपापसामधील स्नेह, जिव्हाळा द्विगुणीत करावा, असेच पालकांनी शाळेवरील प्रेम सदैव असेच राहु द्यावे,असे प्रतिपादन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
यावेळी स्नेहसंमेलना निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या हेतूने विविध क्रीडा स्पर्धा तसेच निबंध, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत .
सदर कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्ग व कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. एन. एस. खरात मॅडम व कु.व्ही.ए.मेहेत्रे मॅडम
यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. एस.बी.हरकळ मॅडम यांनी केले.
________________________

Post a Comment