लोकनेता न्यूज नेटवर्क
नांदेड (बाजीराव पाटील) :- कृतिशील समाजसुधारक श्री संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्ताने नांदेड येथील नक्षत्र फ़ंक्शन हॉल, पूर्णा रोड, नांदेड येथे सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. श्री विठ्ठल पावडे सर, पावडेवाडी हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असून आत्तापर्यंत त्यांनी नांदेड शहरात सर्व महापुरुष आणि संतांच्या जयंतीचे कार्यक्रम आयोजित करून समाजात जातीय सलोखा, सौहार्द, प्रेम, जिव्हाळा पेरण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. या जयंती कार्यक्रमास हिंगोलीचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री नामदेव केंद्रे साहेब, नांदेड शहर वाहतूक पोलीस निरीक्षक श्री साहेबराव गुट्टे साहेब, विशेष अतिथी पोलीस निरीक्षक, भाग्यनगर, नांदेड श्री संतोष तांबे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री उमेश मुंडे, श्री संतराम गित्ते, श्रीनिवास कांगणे, श्री ज्ञानदेव घुगे, अनिता मुंडे, श्री निलेश गित्ते, श्री प्रवीण केंद्रे आदी मान्यवरांसह संतांच्या समता-ममता या वैश्विक विचारांवर प्रेम करणारी अनेक लेखक, संपादक, पत्रकार, प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व संत साहित्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी नक्षत्र फंक्शन हॉल, वामनराव पावडे मंगलकार्यालयासमोर, पूर्णा रोड, नांदेड येथे दिनांक ३ फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक श्री विठ्ठल पावडे आणि संत भागवबाबा जयंती उत्सव समिती, नांदेड यांनी केले आहे.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment