स्व.अजित दादा पवार यांच्या अस्थी कलशाचे मारोतराव पाटील कवळे गुरूजी यांनी घेतले दर्शन


लोकनेता न्यूज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पाटील) :- स्व.अजितदादा पवार यांच्या अस्ती कलशाचे कवळे गुरुजी यांनी साई सुभाष वसंतनगर नांदेड येथे घेतले दर्शन

दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचं योगदान

महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी अर्पण केलं जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उभं राहणं,विकासासाठी ठाम निर्णय घेणं,आणि प्रशासनावर पकड ठेवून काम वेळेत पूर्ण करून घेणं हीच दादांची खरी ओळख होती.सत्ता असो वा नसो,

महाराष्ट्राचा विचार त्यांनी कधी सोडला नाही.त्यांच्या कार्यातून लाखो लोकांना न्याय,दिलासा आणि आशा मिळाली.

आज दादा आपल्यातून गेले, पण महाराष्ट्राच्या इतिहासात

त्यांचं योगदान सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे.साई सुभाष वसंतनगर नांदेड येथे अस्थी कलश दर्शनास उपस्थित माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, माजी आमदार मोहनआन्ना हंबर्डे,माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, दिलीपराव धर्माधिकारी प्रभाकरराव पाटील,कन्हैया कदम,यांच्यासह आदिजन उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments