लोकनेता न्यूज नेटवर्क
वाघाळा (योगेश काकड) :- वाघाळा परिसरात जंगली प्राण्यांचा सुसाट शेतकऱ्यांना करावा लागतो रात्रभर शेतात पहारा वाघाळा परिसरात रोही रानडुकराचा शेतकरी रात्रभर चिंतेत काही दिवसापासून रानडुक्कर रोहित यांचा सुसाट शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांनी काही महिन्यापूर्वी शेतात गहू ज्वारी हरभरा चिया भाजीपाला असे अनेक आपल्या शेतात बी बियाणे पेरले आहे तर अशा वेळेतच जंगली प्राणी शेतात दाखल झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे सकाळी 6 वाजेपासून शेतात जावे लागत आहे तर रात्रभर शेतात झोपावे लागत आहे शेतकऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून शेती आपला परिवार सोडून शेतात पहारा घालावा लागत आहे शेतात जाळ करून तसेच लाकडाचे आपले छोटेसे जागल करून रात्रंदिवस शेतात जागलीवर जावे लागत असून शेतात शेतकरी नाही गेला तर जंगली प्राणी शेतात दाखल होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे रानडुक्कर हा प्राणी शेतकऱ्यावर हल्ला सुध्दा करतो अशी माहिती शेतकरी व्यक्त करत आहे रानडकराचे समोरच्या मोठ्या दाताने शेतकऱ्यावर हल्ला सुद्धा करतो वन विभागाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment