वाघाळा येथे रमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली


लोकनेता न्यूज नेटवर्क

वाघाळा (योगेश काकड) :-  वाघाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात शनिवारी दि 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची 128 वी उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित त्यांनी त्रिशन पंचारती घेतले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खीर वाटप करण्यात आली मिरवणुकीत गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील सरपंच विष्णू काकड उपसरपंच सखाराम माळेकर ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र चव्हाण बाळु बनसोडे अमोल भारशकर कुलदीप चव्हाण विनोद लाखे भगवान खरात दादाराव खरात बबन सानप तसेच वाघाळा प्रतिनिधी योगेश मोठ्या संख्याने उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments