केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली

 वर्धापन निमित्ताने - नागपूर येथे 
राष्ट्रीय परिषद तथा पुरस्कार वितरण सोहळा 


लोकनेता न्युज नेटवर्क 

वैश्विक मानवाधिकार संवर्धन व संरक्षणासाठी संबंध देशभरातील नागरिक आणि तळागाळातील आदिवासींच्या व गोरगरीब दीनदुबळ्यांच्या हक्कांसाठी अहोरात्र जनहित तथा संवैधानिक जागृतीचे पवित्र कार्य करणारी संघटना म्हणून जगभर आपली मानवीय ओळख निर्माण करणाऱ्या - केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्ली - च्या १५ व्या स्थापना व दै. मानवाधिकार समाचार च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले
यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील रवि भवन येथे राष्ट्रीय परिषद व विविध क्षेत्रातील समर्पित सेवेसाठी सातत्याने झटणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे तसेच सदर सोहळ्यामधे मा. अध्यक्षांसह संगठन चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲड. अमान मार्कर, राष्ट्रीय विधी सल्लागार तथा उपाध्यक्ष आणि मा. अजय पात्रे, राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सचिव यांचे, जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाच्या मानवाधिकाराच्या कक्षेत येणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा, शुध्द हवा-पाणी, निरोगी वातावरण, योग्य रूग्णोपचार, शिक्षणावश्यक सुविधा, दळणवळण - भ्रमण सुरक्षा, महिला व बाल कल्याण संरक्षण तथा शास्वती, समान संधी - न्याय, उद्योग - उदिम - रोजगार - नोकरी - व्यवसाय उपलब्धता आणि याच बरोबर प्रत्येकाची संवैधानिक कर्तव्ये इ. वर बहुमुल्य मार्गदर्शन होणार आहे.
तरी या परिषदेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन नम्रपणे करण्यात येत आहे.
________________________

0/Post a Comment/Comments