शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमला यांचे राज्यस्तरीय फार्मा व्हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश!


लोकनेता न्यूज नेटवर्क 

औसा /जाफर पटेल :- जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय फार्मा आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ मध्ये शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, आलमाला, ता. औसा, जि. लातूर येथील संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.

या दिमाखदार विजयाबद्दल संघाला रु. ७,००० रोख पारितोषिक, मानाची ट्रॉफी आणि सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले. संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक भावना, जिद्द, शिस्त आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले. संघाला योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सहकार्य लाभल्यामुळे हे यश साध्य झाले. महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या विजयामुळे संस्थेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

 

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही संघाने अशीच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखावी, अशा शुभेच्छा व्यक्त करत या यशस्वी कामगिरीबद्दल संघाचे व्यवस्थापक डॉ. प्रसाद काटारे , सर्व खेळाडू, प्रशिक्षक, यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विश्वेश्वर धाराशिवे तसेच संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.________________________

0/Post a Comment/Comments