काँग्रेस कमिटीचे महागाव तहसीलदारांना निवेदन
लोकनेता न्यूज नेटवर्क
महागाव सय्यद मुदस्सीर :- प्रशासनाकडून आदेश काढण्यात येऊन शेतकऱ्यांच्या भविष्यात होणाऱ्या उत्पादनावर जो अन्यायकारक आदेश काढण्यात आला. शेतकऱ्यांनी खरीप हंगाम चालू होतांना हळद व ऊस या पिकाची वरील धरण, नदी, नाले व तलाव या पाण्यावर अवलंबून लागवड केलेली आहे. सदरील पिकासाठी आजपर्यंत शेतकऱ्यांनी एकरी साधारणपणे १,२०,००० पर्यंत एकरी खर्च केला असून आज ऊस आणि हळदी या पिकाची परिस्थिती गंभीर बनली आहे. हळदीच्या कांड्या धरण्याच्या अवस्थेत आहे आहे आणि या ८ ते १५ दिवसांमध्ये वरील दोन्ही पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे लावण्यात आलेले निर्बंध तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी काँग्रेस पक्षातर्फे २१ ऑक्टोबर रोजी निवेदनातून मागणी करण्यात आली.
आधीच खरीप हंगामातील सोयाबीन या पिकाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची आणि कर्जबाजारी पणाची सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे, तरी आपण वरील प्रमाणे ४ ऑक्टोबर २०२६ रोजी धरण, नदी, नाले व तलाव यामधून पाणी उपसा करण्यासाठी लावलेले मोटार पंप शेतकरी बांधवांनी काढण्या बाबत जो आदेश दिला तो रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. त्यावर उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थिती सहकार्य करावे अशा आशयाचे २१ऑक्टोबर रोजी महागाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर शिवाजीराव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यवतमाळ, सुनील राठोड तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी महागाव, सौ. जयश्री संजय नरवाडे तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी महागाव, शैलेश कोपरकर शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी महागाव,भगवान पंडागळे, बंटी पठाण, सुनील भवानकर आणि प्रा.शरदचंद्र डोंगरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.________________________

Post a Comment