चारठाण्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा



तथागत बुद्धांना अभिवादन; पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण


लोकनेता न्युज नेटवर्क
 

चारठाणा: किरण निकाळजे :- चारठाणा येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहपूर्ण व चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विश्वशांती बौद्ध विहारात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

   कार्यक्रमाच्या प्रारंभी विहारातील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विहाराच्या प्रांगणात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

   या वेळी भीमराव निकाळजे, उमाजी निकाळजे, मधुकर भवाळे, भाऊराव भवरे, नामदेव भवरे, वसंत निकाळजे, धर्मानंद भवरे, नानासाहेब निकाळजे, विठ्ठल भवरे, राजेभाऊ भवाळे, सुंदर निकाळजे, अशोक भवरे, गिरजाजी निकाळजे, आनंद निकाळजे, श्रीधर भवरे, बाबासाहेब निकाळजे, विशाल निकाळजे, मिथुन कवळे, महेंद्र निकाळजे, सचिन निकाळजे, मुन्ना निकाळजे, किरण निकाळजे व अविनाश भवरे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.

   बौद्ध वंदना आणि पंचशील ग्रहणाने कार्यक्रमाची सांगता झाली.________________________

0/Post a Comment/Comments