डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीपासून नागरिकाचे १२.५०. लाख रुपये वाचविण्यात


येरवडा सायबर पथकास यश


लोकनेता न्युज नेटवर्क 

 हवेली (संतोष कदम) दि.०५/१०/२०२६ रोजी फिर्यादी यांना एका अनोळखी नंबर वरून फोन आल्याने समोरील इसमाने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तुमचे एटीएम कार्ड नरेश गोयल नावाच्या आरोपीकडे मिळाले असून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अटक टाळायची असेल तर तुमच्या बँक खात्याची, एफडी ची माहिती व पासवर्ड द्या अशी धमकी देऊन डिजिटल अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला.


फिर्यादी यांनी घाबरून सर्व बँकांची माहिती दिल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ येरवडा पोलीस स्टेशनच्या सायबर टीमशी संपर्क साधले नंतर सायबर पथकाने नमूद बँकांशी तात्काळ संपर्क करून फिर्यादी यांचे अकाउंट ब्लॉक केल्याने बँक खात्यातील फिर्यादी यांचे १२.५०. लाख रक्कम सुरक्षित करण्यात यश आले.


सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परी -०४ श्री चिलमला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनील जैतापुरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गित्ते व पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती शारदा कोकाटे पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती केशव दिंडे यांचे मार्गदर्शनाखाली पो उप-निरी गणेश राठोड, पोलीस अंमलदार समीर पिलाने, मनोज भागवत, स्वप्निल पिंगळे, म. पो. अंमलदार रोहिणी भोकसे, मिनाक्षी कापडे सायबर तपास पथक येरवडा पोलीस स्टेशन यांनी केली.


नागरिकांना आवाहनः अशा प्रकारे सीबीआय, ईडी, पोलिस, कस्टम्स च्या नावाने डिजिटल अरेस्ट चा फोन आल्यास घाबरून जाऊ नका, कोणतीही वैयक्तिक माहिती, ओटीपी, पासवर्ड शेअर करू नका आणि तात्काळ १९३० वर किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा.

 ________________________

0/Post a Comment/Comments