शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकनेता न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : माझ्या आईच्या पोटी मी जन्मलो अन जगाचे दर्शन झाले.ऐन तारुण्यात माझा कवितेच्या पोटी जन्म झाला अन जग मला ओळखू लागले.आईने बोट धरून चालणं शिकवलं तर कवितेने बोट धरून बोलणं शिकवलं.आई आशीर्वाद देतांना म्हणायची औक्षवंत हो! कविता आशीर्वाद देतांना म्हणायची मी तुला चिरंजीव करीन.मित्रहो,कवितेनं भरभरून ओळख दिली.शालेय अभ्यासक्रमापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमात कवितेनेच मला मिरविले.आपल्या सारख्या श्रोत्यांपासून सातासमुद्रापार असलेल्या वाचकांपर्यंत पोहचवले.मातृप्रेम यापेक्षा आणखी काय वेगळे असते.म्हणून मी तिला आईच संबोधतो.
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आयोजित दि. ३ व ४ऑक्टोबर२०२६ या दोन दिवशीय चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज साहित्य नगरी व आदिशक्ती संत मुक्ताई व्यासपीठ संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर शेजारी भव्य सभागृहात ते कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.संभाजीनगर येथील उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष बागल यांचे अध्यक्षतेखाली संमेलन नुकतेच भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न झाले.
या संमेलनातील भव्य ग्रंथ दिंडी सर्वांचेच आकर्षण ठरले यामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना आदिशक्ती संत मुक्ताई कडून भव्य आणि दिव्य हार सर्वांच्या उपस्थितीत अर्पण करण्यात आला हे या संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले.
एरंडोल जिल्हा जळगाव येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन सुद्धा भन्नाट गाजले या प्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे कोल्हापूर येथील डॉ.मारुती गुरव अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिक श्री तुळशीराम बोबडे श्री वासुदेव खोपडे अमरावती येथील प्रा.डॉ.मंदा नांदुरकर श्री संजय ठोसर फाऊंडेशनचे बार्शी जिल्हा सोलापूर येथील कवी अशोक मोहिते, प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके, आळंदी येथील सौ.रूपाली चिंचोलकर सांगली येथील सौ.मेघा पाटील बेळगाव कर्नाटक येथील प्रा.विनायक पाटील पुण्यातील श्री जगन्नाथ बुडूखले गुरुजी खामगाव येथील श्री पांडुरंग दैवज्ञ श्री शंकरराव अनासुने श्री बाळु भाऊ इटणारे साखरखेर्डा येथील कवी रामदास कोरडे
आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थिती व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी नाशिक येथील डॉ. रमाकांत जाधव डॉ. श्यामकुमार दुसाने जळगाव येथील श्री मधुकर पोतदार भुसावळ येथील ज्ञानेश्वर घुले,नांद्रा येथील कवी स्वप्नील पाटील, एरंडोल येथील श्री निंबा बडगुजर धाराशिव येथील डॉ. मधुकर हुजरे शिरपूर येथील श्री अरविंद भामरे धुळे येथील प्रा.अश्विन अमृतकर, धुळे येथील श्रीमती रंजना पवार बदलापूर येथील श्री रमेश उज्जैनकर बुलढाणा येथील श्री डी.आर. बांगर कोल्हापूर येथील श्री प्रवीण सूर्यवंशी प्रा.डॉ.सविता व्हटकर, प्रा.आरती लाटणे, श्री साताप्पा सुतार लातूर येथील श्री गुरु हराळे बेळगाव कर्नाटक येथील श्री शांताराम भादवणकर पुणे येथील श्री जगन्नाथ बुडूखले सौ.धनश्री म्हेत्रस, आदी कवी व कवयित्रींनी या कवी संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यातील कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन फाउंडेशनच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षा सौ.प्रीती नंदलाल मोरे व फाउंडेशनच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षा सौ. सारिका जोशी यांनी केले त्याप्रसंगी शेवटी या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा.वा.ना.आंधळे यांनी सुद्धा आपली कविता सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. प्रा.आंधळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,कविता जन्माला आली अन जगण्याला मोल आले.दृष्टी आणि सृष्टी सुंदर झाली.कविता ही भेदाच्या पलीकडे नांदत असल्यामुळे व वयाच्याही मर्यादा तिला आड येत नसल्यामुळे जगाचे मातृपद कवितेकडे जाते.या विधानाची सार्थकता माऊलीच्या पायासदनाचे उदाहरण देत त्यांनी श्रोत्यांपुढे कवितेची थोरवी कथन केली.याबरोबरच संमेलनाच्या एकूणच आयोजन नियोजनावर भाष्य करतांना ते म्हणाले ,हे चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन गेल्या दोन दिवसापासून विविध उपक्रमांनी व विविध जिल्ह्यातून,राज्यातून आलेल्या साहित्यिक, रसिकांची दाद मिळवून गेले. या संमेलनाच्या यशाचे श्रेय उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना व त्यांच्या सर्व कुटुंबीयांना तसेच नातेवाईकांना आणि फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना जाते.या भावशब्दात एकूणच साहित्य संमेलनाविषयी कृतज्ञता कवी संमेलनाध्यक्ष प्रा.वा. ना.आंधळे यांनी उपस्थितांसमोर नोंदवली.
________________________

Post a Comment