आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली फराळ व किटचे वाटप.
सेनगाव / महादेव हारण :- हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून हिंगोली शहरातील विविध भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांसोबत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिवाळी हा आनंद उत्साह आणि आपुलकीचा सण आहे समाजातील प्रत्येक घटकाला या सणाचा आनंद घेता यावा या सामाजिक भावनेतून हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधत यावर्षीची दिवाळी मोठ्या उत्साहात आनंदात साजरी केली. यावेळी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष फुलाजीराव शिंदे. माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, नगरसेवक हमीद प्यारेवाले. नगरसेवक उमेश गुट्टे नगरसेवक राजेश गोटे. नगरसेवक अजेय गायकवाड. भाऊराव ठाकरे.रजनीश पुरोहित. विलास गोरे महेश थोरात.पवन उपाध्याय. आशिष जेस्वाल .पद्माकर नाईक. संजय दंडे .संदीप टार्फे. संजय खंडेलवाल. श्याम खंडेलवाल. बाबा घुगे. लखन कुरील. गोपाल मुधोळकर. यांच्यासह आदी पद अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
________________________

Post a Comment