पाणीपुरवठा, नालेसफाई आणि रस्त्यांच्या समस्यांवर महिलांचा संताप; मागण्या पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कडे मोर्चा काढण्याचा निर्वाणीचा इशारा.
लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे.
सेनगाव / महादेव हारण :- हिंगोली : सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे गुगूळ पिंपरी गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरवस्था आणि नाल्यांमधील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुगल पिंपरी येथील महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक २ नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते त्या अनुषंगाने
आज आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले. डफडे वाजवून ग्रामपंचायत प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित करून प्रत्येक घरापर्यंत नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी प्रमुख मागणी महिलांनी केली.
तसेच गावातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील रस्त्यांची दुरवस्था दूर करून रस्त्यांची कामे करावीत, नाल्यांची तातडीने साफसफाई करावी आणि पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
ग्रामपंचायत प्रशासनाला महिलांचा निर्वाणीचा इशारा!
गावातील मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मागण्यांची पूर्तता करावी. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयावर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनावर महिलांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला.
या आंदोलनात गावातील अनेक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आता तरी ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का? महिलांच्या मागण्यांची दखल घेऊन गावाला स्वच्छता आणि नियमित पाणीपुरवठ्याची सुविधा मिळणार का? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बालाजी देशमुख यांच्या वतीने महत्वाचा मुद्दा लावून धरला यावेळी गजानन हिरामण इंगोले शरद पाईकराव दत्ता भगवान इंगोले संदीप तुळशीराम सुनील इंगोले रेखा भगवान इंगोले यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लेखी आश्वासनानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले आठ दिवसात गावातील नालेसफाई करून पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करून देण्यासाठी आश्वासित केले आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा महिलांचा इशारा.
________________________

Post a Comment