ऊसतोड कामगारांच्या झोपडीत फुलली दिवाळी



जि.प.सदस्य रोहित चव्हाण यांनी कष्टकरी कुटुंबांसोबत साजरा केला सण; फराळ, फटाके अन् किराणा साहित्याचे वाटप


लोकनेता न्यूजनेटवर्क 

जिंतूर / रत्नदीप शेजावळे :- दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत जिल्हा परिषद सदस्य रोहितभैया चव्हाण यांनी यंदाची दिवाळी ऊसतोड कामगारांच्या झोपडीत साजरी केली. कोणताही दिखावा न करता त्यांनी ऊसतोड कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिवाळी फराळ, चिमुकल्यांसाठी फटाके आणि किराणा साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमामुळे कष्टकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे रोहित चव्हाण यांनी सांगितले. सण-उत्सव साजरे करताना समाजातील वंचित आणि गरजू घटकांनाही आनंदात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कष्टकरी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही आपली जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यापुढेही कोणताही गाजावाजा न करता गाव, तांडा आणि वाडी-वस्तीवरील गरजू कुटुंबांसोबत सण साजरे करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमात सरपंच सुधाकर जाधव, भाजपाचे जिल्हा सचिव गजानन चव्हाण कवडेकर, तांडा सुधार योजना समितीचे अध्यक्ष सचिन मोहन आढे, सचिन राठोड, केशव चव्हाण, विलास चव्हाण, स्वप्नील ऊर्फ बबलू राठोड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यातच दिवाळीचा खरा आनंद आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
________________________

0/Post a Comment/Comments