ईसापुर(टा.) येथे वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलनचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न,



अनेक माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि मनोगत व्यक्त,

ए.पि.ओ.उमरखेड संतोष पांडे व डॉ.सचिन गिरी फुलसावंगी यांनी केले आयोजन,
लोकनेता न्यूज नेटवर्क

उमरखेड :- गोपीचंद दोडके :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह उमरखेड मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम फुलसावंगी रोडवर असलेल्या 
ईसापुर(टा)येथे अनेक माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्नेहमिलन मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
 या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तत्कालीन डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाचे सेवानिवृत्त अकोट येथील गृहपाल पी.आर.पांडे साहेब तसेच कर्मचारी कोकणे व मारोती पाचखंडे साहेब हे उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गृहपाल पी. आर.पांडे साहेब यांचे कैलास बुरकुले यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात केले,
प्रास्ताविक मनोगतातून संतोष पांडे यांनी वस्तीगृहातील सर्व जुन्या आठवणींना व्यक्त केले, त्यांनी आपल्या शालेय जीवनात व वस्तीगृहातील मित्रांना घडलेल्या व्यथा आणि कथा सांगितल्या, व पुढील आयुष्यात आपण सर्वांसोबत कायमस्वरूपी राहणार, 
असे अतिशय मोलाचा संदेश दिला,
 आपल्या मनोगतातून त्यांनी सांगितले की प्रत्येकाच्या आयुष्यात मित्राचे महत्त्व अतिशय जास्त आहे, मित्राच्या संपर्कात रहा आणि चांगले आयुष्य जगा, निर्व्यसनी रहा आरोग्य चांगले ठेवा, अशा प्रकारचे मार्गदर्शन केले,
श्री गजानन नावडे यांनी सूत्रसंचालन केले,
निसर्गाच्या सानिध्यात आयोजित करण्यात आलेल्या डॉ.सचिन गिरी यांच्या ईसापुर टाकळी रोड येथील फार्म हाऊसवर अनेक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता, 
सदर कार्यक्रमाचे आयोजन उमरखेड 
ए. पि.ओ.संतोष पांडे व डॉ. सचिन गिरी फुलसावंगी यांनी आयोजित केले होते, कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील काम करणारे अनेक माजी विद्यार्थी यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा देताना आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या, जुन्या आठवणी सांगताना अनेक वर्षानंतर व्यासपीठ मिळाल्यामुळे, अनेकांचे कंठ दाटून आले, मनमोकळ्या भावना व्यक्त करताना मित्राप्रती असलेल्या आपुलकीच्या भावना व्यक्त केल्या,प्रत्येकाच्या मनात साठवलेले अनेक जुने किस्से सांगण्यात प्रत्येकाने आवर्जून सांगितले, सोबत असलेल्या मित्रांच्या चांगल्या वाईट,गोष्टी, सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला,
नारायण काळे, डॉ. सचिन गिरी,कैलास सरकाळे नारायण शेळके,शिवाजी गडदे, पंजाब बेले, गोपीचंद दोडके, सुरेश जाधव, मारोती लुटे, कैलास बुरकुले, श्याम बुरकुले, संजय मेटकर, संजय पहाडे, राजू बरडे, पोलीस पाटील उत्तम बनसोड, कैलास चव्हाण, डॉ, विशाल माने, डॉ. शिवानंद कवाने साहेब, प्रवीण जाधव, कानकाटे, अनंता नलावडे, सम्राट सिंगणकर, एपीओ परमेश्वर गायकवाड,पोलीस पाटील लक्ष्मण नप्ते, देवा करेवाड सतीश कंठाळे, राम पंडागळे, संतोष डाखोरे, फाजील खान,विष्णू पवार,
गजानन चव्हाण, पो.पा.रणजीत बहादुरे, गजानन पिंपळे,
अशा अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तीगृहातील अनेक आठवणी आपल्या मनोगतून व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या,
जिल्हा परिषद शिक्षक संजय पहाडे सर यांची कन्या कु.स्वराली हिने अतिशय मंत्रमुक्त आवाजामध्ये "पल पल दिल के पास"अशा बहारदार गाण्यांचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली,
वस्तीगृहाचे सेवानिवृत्त गृहपाल पी आर पांडे साहेब यांनी आपल्या गृहपाल काळातील आठवणींना व्यक्त करताना सांगितले की, मी माझ्या नोकरीच्या काळामध्ये प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न केले,
"वरून नारळासारखा टनक तर होतो पण आतून मृदु आणि नरम पण होतो,"
विद्यार्थ्यांना शिस्त लावताना कठोर वागलो कारण की मी शासनाचा पगार घेत होतो त्यामुळे त्या पद्धतीची सेवा करणे बंधनकारक होतं, 
माझा उद्देश होता "माझा विद्यार्थी घडला पाहिजे, तसेच तो संस्काराने वागला पाहिजे, मी आयुष्यात तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही जे करायचं ठरवलं ते मी केलं,"
त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी केली, 
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी सांगितले की, आपण समाजासाठी काम केले पाहिजे, अनेक विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले,
आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानण्यात आले,
समूह छायाचित्रण करून,
सर्व विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर,
सैराटच्या प्रसिद्ध झिंगाट गाण्यावर समूह नृत्य करून आनंद व्यक्त केला,
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकाच्या वतीने स्नेहभोजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता, वस्तीगृहातील प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमेल तेवढं आर्थिक सहकार्य देऊन मोलाचा वाटा उचलला,अशा पद्धतीने अविस्मरणीय स्नेहमिलन कार्यक्रमाची सांगता झाली
________________________

0/Post a Comment/Comments