राहेरी बु येथे शिवसेनेकडून आनंदाचा शिधा वाटप गरजू कुटुंबियांसोबत फुलला दिवाळीचा आनंद




लोकनेता न्युज नेटवर्क
 

राहेरी बु / प्रतिनिधी - ज्ञानेश्वर तिकटे :-दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गावातील गरजू कुटुंबियांसोबत दिवाळीचा आनंद वाटण्यासाठी शिवसेनेच्यावतीने राहेरी बु येथे आनंदाचा शिधा वाटप उपक्रम राबविण्यात आला.

   शिवसेना प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या पुढाकारातून संपूर्ण महाराष्ट्रात ही सामाजिक मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या आदेशानुसार सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते गावागावात आनंदाचा शिधा, किराणा किट, निराधारांना मदत व फराळाचे किट वाटप करण्यात आले.

   शनिवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी राहेरी बु येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम पार पडला.

  समाजातील वंचित, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलावे, त्यांनाही सणासुदीचा आनंद सन्मानाने अनुभवता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कार्यकर्त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.

   या उपक्रमाच्या आयोजनात शिवसेना विभाग प्रमुख धनंजय देशमुख, शाखा प्रमुख रमेश देशमुख, बूथ प्रमुख ज्ञानेश्वर तिकटे, बूथ प्रमुख ज्ञानेश्वर देशमुख, माजी सरपंच गौतम गवई, विशाल सोनुने, दर्शन देशमुख युवा सेना शाखा प्रमुख, प्रदीप देशमुख,विकास देशमुख, बंडू देशमुख, राहुल देशमुख, बाबासाहेब देशमुख,सनी फलटणकर यांनी विशेष पुढाकार घेतला.

   सामाजिक जाणिवेतून गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी केलेल्या नियोजनाचे उपस्थित नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________

0/Post a Comment/Comments