लोकनेता न्युज नेटवर्क
वाघोली | संतोष कदम :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-७ यांचे नेतृत्वाखाली दि.१६/११/२०२६ रोजी वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकातील पोलीस अधिकारी उप-निरीक्षक शिवशंकर राघु व पोलीस अंमलदार असे केसनंद भागात पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जोगेश्वरी पॅलेसकडुन जोगेश्वरी डोंगराकडे जाणा-या रस्त्यावर ३ ते ४ इसम दोन दुचाकीसह थांबले असुन त्यांचेजवळ पिस्टल आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तातडीने पो.उप. निरीक्षक राघु यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळवुन सदर ठिकाणी तपास पथकातील पोलीस अंमलदारांसह नमूद ठिकाणी पोहचुन बातमीप्रमाणे वर्णन असलेल्या संशयित इसमांना पकडुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेजवळ एकुण ४ देशी बनावटीचे पिस्टल व ४ मॅगझीन व १५ जिवंत काडतुस रोख रक्कम, मोबाईल व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदरवेळी १) आकाश ऊर्फ गज्या अशोक मोरे वय २१ वर्षे, रा. नवरत्न सोसायटी, वडगावशेरी, पुणे २) मनिष दिलीप फर्नाडीस, वय २६ वर्षे, रा, चांदोर मडगाव, साऊथ गोवा, गोवा ३) चंद्रेश्वर मल्लेशी चारी, वय २१ वर्षे, रा, चांदोर मडगाव, साऊथ गोवा, गोवा यांना अटक करण्यात आली असुन एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
नमूद आरोपीं व विधीसंघर्षित बालक यांचेकडुन एकुण ४,१८,५००/- रु कि.चा. मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असुन त्यामध्ये १,८०,०००/- कि.च्या एकुण ४ देशी बनावटीच्या पिस्टल, ७,५००/- कि चे १५ जिवंत काडतुसे, २०.०००/- रोख रक्कम व १,७०,०००/- रु कि च्या दोन दुचाकी व केटिएम तसेच ४०,०००/-रु कि.चे ४ मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरबाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.७८८/२०२६, भा.न्या.सं.क. ३ (५), आर्म अॅक्ट क. ३ (२५) ७ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरबाबत अधिक तपास पो.उप. निरीक्षक शिवशंकर राघु, वाघोली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-७ श्री. अबिनाश कुमार यांचे नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस स्टेशन, श्री. नंदकुमार गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पो.उप.निरीक्षक शिवशंकर राघु, पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, भोईने, अशोक शेळके, महादेव कुंभार, मारुती वाघमारे, विशाल गायकवाड, मंगेश शेळके यांचे पथकाने केली आहे.
________________________

Post a Comment