शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.संतोषदादा बांगर यांच्या हस्ते विमोचन
सेनगाव / महादेव हारण :- दिवाळीच्या मंगलमय वातावरणात वाचकांसाठी साहित्यिक मेजवानी ठरणाऱ्या 'दैनिक गाववाला'च्या दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा दि.१५ नोव्हेंबर रविवार रोजी सेनगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका आयोजित कार्यक्रमात मोठ्या दिमाखात व उत्साहात पार पडला.शिवसेना (शिंदे गट) हिंगोली जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषदादा बांगर यांच्या शुभहस्ते या विशेषांकाचे थाटात विमोचन करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पार पडलेल्या या सोहळ्याला राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली.यावेळी व्यासपीठावर माजी जि प सदस्य श्री द्वारकादासजी सारडा,युवानेते प्रितेश सारडा,तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी,प्रकाशराव देशमुख,माजी सभापती कांतराव हराळ,माजी उपनगराध्यक्ष निखिल देशमुख,गजानन पोहकर पाटील,युवासेना तालुकाप्रमुख अशोक इंगळे,जितू देशमुख,नगरसेवक गणेश बांगर,कपिल खंडेलवाल,दिनकर गंगावणे,गजानन गांधिले,रामराव जाधव,पवन पायघन,मधुर भंसाळी,राजु नागरे,झनकराव तिडके आणि 'दैनिक गाववाला'चे सेनगाव तालुका प्रतिनिधी विश्वनाथ देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रकाशन प्रसंगी सर्वच मान्यवरांनी विशेषांकातील दर्जेदार मजकुराचे कौतुक केले आणि दैनिक गाववालाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
________________________

Post a Comment