माजी विद्यार्थी अरविंद पाटील यादवकुळे व ॲड सुदर्शन घोडेकर यांनी केले आयोजन
लोकनेता न्यूज नेटवर्क
उमरखेड | गोपीचंद दोडके :- महाविद्यालयीन जीवनातील ते सोनेरी दिवस, कट्यावरच्या गप्पा आणि ३२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा तीच निर्मळ मैत्री अनुभवण्याचा सुवर्णयोग दिवाळीच्या निमित्ताने जुळून आला. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी कला व वाणिज्य महाविद्यालय, सवना येथील माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमिलन सोहळा नुकताच शनिवारी (ता. १४) उमरखेड येथील तुळशी हॉटेलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला.
दिवाळीच्या मंगलपर्वावर आयोजित या सोहळ्यासाठी नोकरी व व्यवसायानिमित्त दूरवर स्थायिक झालेले वर्गमित्र आवर्जून उपस्थित राहिले होते. तव्वल ३२ वर्षांनंतर एकमेकांना पाहताच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले, तर काहींना जुन्या आठवणींनी गहिवरून आले. यावेळी सर्वांनी आपला सध्याचा परिचय करून देत गेल्या तीन दशकांतील जीवनप्रवासाचे अनुभव कथन केले. महाविद्यालयातील किस्से, प्राध्यापकांच्या आठवणी आणि वर्गातील गमतीजमती सांगताना सभागृहात
हास्याचे फवारे उडत होते. विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असलेले हे मित्र-मैत्रिणी आपली पदे विसरून पुन्हा महाविद्यालयीन तरुणाईच्या उत्साहात रमले. दिवाळी फराळाचा आस्वाद आणि जुन्या गाण्यांच्या मैफलीने सोहळ्याची रंगत वाढवली.
यापुढेही एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपत महाविद्यालयासाठी व गरजू विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम राववण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सोहळ्याला अरविंद पाटील यादवकुळे,आशीर्वाद कवडे,
सुधाकर देशमुख, शिवाजी फुलसावंगे, राजेश पवार, सुभाषराव देशमुख, सुनीता रामेश्वरे, मंदा चवरे, सुधीर महाजन, वर्षा तायडे, ॲड सुदर्शन घोडेकर, सविता चव्हाण, विशाल नाईक, गुणाजी रावते, मालाताई सापतकर, डॉ,प्रा.स्वातीताई दळवी रणजीत चव्हाण, विनोद बांडे,सीमा कावळे, देवानंद शिरडकर, कांचन सुरोशे, अर्चना माळोदे, सुधाकर हिंगाडे, रवी भगत, बेबीताई टेकाळे, रेखाताई राजूरकर,चंदा कांबळे, विष्णू धबडगे, आणि सुभाष भवरे उपस्थित होते.
________________________

Post a Comment