पत्रकार रामदास कहाळे यांचा उमेदवारी अर्ज, मतदारांमध्ये चर्चेचा विषय
सिंदखेड राजा (ज्ञानेश्वर बुधवत) :- विधानसभा निवडणुकांच्या तारखा जवळ येत आहेत तसतसे उमेदवारांच्या हालचालीत तीव्र होताना दिसत आहेत दिनांक 22 पासून उमेदवारी अर्ज घेण्यास इच्छुक उमेदवारांनी सुरुवात केली आहे. सिंदखेड राजा मधून रामदास कहाळे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह तहसील कार्यालय सिंदखेड राजा येथे अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे रामदास कहाळे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये सक्रिय असून. आडगाव राजा येथील सरपंच पद सुद्धा त्यांनी भूषवले असून सरपंच संघटनेचे ते या ठिकाणी सक्रिय तालुकाध्यक्ष राहिले आहेत. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये चांगलाच प्रभाव असून त्यांचा मतदारसंघातील लोकांसोबत तगडा जनसंपर्क आहे या अपक्ष उमेदवारीमुळे प्रस्थापितांना चांगलाच हादरा बसू शकतो हे मात्र नक्कीच.
__________________________________
Post a Comment