अकोला (ज्ञानेश्वर बुधवत) :- दि. ३१-१०-२०२४ - मैत्रीच्या राष्ट्रीय कवितेचे जनक कविवर्य अनंत राऊत यांच्या वडिलांच्या दु:खद निधना निमित्त त्यांच्या निवासस्थानी, मौजे व्याळा येथे जावून, अंतर्राष्ट्रीय ख्याती प्राप्त ज्येष्ठ कवी कथाकार डॉ. बबनराव महामुने, हिवरा आश्रम, जि. बुलढाणा, ज्येष्ठ समाजसेवक तथा अंतर्राष्ट्रीय पुरस्कृत कवी डॉ. डी. व्ही. खरात सर, सचिव, नागसेन बौद्ध विहार, चिखली, बुलढाणा, भावकवी बौध्दाचार्य आयुष्मान अंकुश पडघान, बोरगाव काकडे, चिखली तथा ज्येष्ठ विधिज्ञ तसेच भारतीय कुटुंब संस्थेचे पावित्र्य अन् महात्म्य अंतर्राष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहचविणाऱ्या - त्या तरू च्या सावलीला, चल सखे बोलू जरा
- या कवितेचे धनी सुप्रसिद्ध कवी साहित्यिक डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली यांनी,
दि. ३१-१०-२०२४ रोजी कविवर्य राऊत व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन
शोक संवेदना प्रकट केली तेव्हा कवी अनंत राऊत यांनी वरीलप्रमाणे उदगार काढले.
याप्रसंगी त्यांच्या मातोश्री, नातेवाईक तथा साहित्यिक आयुष्मान महेंद्र कराळे तथा लोकप्रिय सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते मा. अनिल गावंडे, तेल्हारा, अकोला यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि साहित्यिक यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे साऱ्या दु:खावर मात करीत कवी राऊत यांनी त्याही वातावरणात
काव्यमहेफील घडवून आपल्या सकारात्मक पुरोगामीत्वाचे दर्शन घडवून मनाचा मोठेपणा दाखवून दिला. ऐसा कवी भेटणे विरळाच.
________________________________
Post a Comment