असोसिएशन ऑफ मेडिकल ऑफिसर्स महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी डॉ ज्ञानेश्वर पाटील गायकवाड यांची निवड

 

लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (बाजीराव पा.गायकवाड) :-कळका ता.कंधार जि नांदेड येथील भुमिपुत्र डॉ.ज्ञानेश्वर पाटील गायकवाड सिव्हिल हॉस्पिटल परभणी यांची असोसिएशन ऑफ मेडिकल ऑफिसर्स महाराष्ट्र राज्य समन्वयक पदी निवड करण्यात आली असून नियुक्ती पत्र देऊन असोसिएशन ऑफ मेडिकल ऑफिसर्स महाराष्ट्र राज्य संघटनेत डॉ ज्ञानेश्वर पाटील गायकवाड यांचे कार्यस्थळ सर्वत्रअसेल असे सांगितले आहे.संस्थेच्या नियमांचे पालन करून  वैद्यकीय व्यावसायिक नीतिमत्तेचे तसेच भारतीय संविधान आणि वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी शासन प्रशासनाला सहकार्य करून क्षेत्रात कार्यकारिणी सदस्य बनवण्यासाठी डॉ ज्ञानेश्वर पाटील गायकवाड यांची निवड झाली आहे त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल गावकरी मंडळी वकील, शिक्षक, पोलिस, डॉक्टर,मित्र मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक आणि राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

_________________________

0/Post a Comment/Comments