लोकशाही पत्रकार संघाच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इस्माईल महेबुब शेख यांचा महादेव विद्यालय धनेगाव येथे सत्कार संपन्न

लोकनेता न्युज नेटवर्क

लातूर (विष्णू मोहन पोले) :- लोकशाही पत्रकार संघाच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री महादेव विद्यालय धनेगाव च्या वतीने पत्रकार इस्माईल महेबूब शेख यांचा सत्कार करण्यात आला.लोकशाही पत्रकार संघ संपूर्ण भारतभर पसरलेला असून पत्रकार बांधवांच्या मदतीला धावून येणारा पत्रकार संघ आहे.अन्याय , अत्याचार, भष्टाचार यांच्या विरोधात निर्भिड पणे कार्य करणारे दैनिक लोकनेता पेपर चे निलंगा तालुका प्रतिनिधी यांची लोकशाही पत्रकार संघ निलंगा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री.महादेव विद्यालय धनेगाव चे प्राचार्य रामलिंग मुळे सर, पर्यवेक्षक श्री बंडगर सर, श्री पवार सर, श्री कौटुंबे सर, श्री भंडेसर, श्री बिजापुरे सर, श्री कांबळे सर होमगार्ड तपासे यांच्या उपस्थितीत दैनिक लोकनेता चे पत्रकार इस्माईल महेबुब शेख यांचा सत्कार करण्यात आला.

_________________________

0/Post a Comment/Comments