सिंदखेड राजा :- संबंध महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या, बुलढाणा जिल्ह्यातील, विकलांग मनोरुग्ण तरूणीच्या बलात्कार व खूनाच्या निर्घृण प्रकरणास वाचा फोडून महाराष्ट्रभर आंदोलन करून संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी व त्यांना कायदेशीर शिक्षा होण्यासाठी मोठा संघर्ष उभा करण्यामध्ये व संबंधित आरोपींना अटक व जन्मठेपेची शिक्षा होऊन, मृत पिडीतेस मरणोत्तर न्याय मिळवून देण्यामधे तत्कालीन महिला सुरक्षा संघर्ष समितीच्या महाराष्ट्राच्या सेनानी मा. सिमाताई साखरे यांच्या सह बुलढाणा जिल्ह्यातील महिला सुरक्षा समितीच्या प्रखर आक्रमक सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रभाताई चिंचोले, डॉ. कुसुमताई देशमुख, ॲडव्होकेट विजयकुमार कस्तुरे तथा रेखाताई हणमंते ( ॲडव्होकेट ) यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या त्या सामाजिक व संवैधानिक कार्याची दखल घेऊन बहुजन साहित्य संघ, चिखली च्या वतीने
दि. ३१-०३-२०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे संपन्न झालेल्या बहुजन साहित्य संमेलन,२०२५ मधे डॉ. प्रभाताई चिंचोले, बुलढाणा यांना तसेच डॉ. कुसुमताई देशमुख, चिखली यांना, बहुशृत बहुमानाचा, फुले - शाहू - आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात येवून सन्मान चिन्ह तथा मां जिजाऊंच्या माहेर नगरी मधील या साहित्य संमेलनात येवला पैठणी व पुष्पगुच्छ प्रदान करून मा. डॉ. सावली राऊत तथा सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री डॉ. रेणू जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सद्यस्थितीत तब्येतीच्या कारणास्तव डॉ. प्रभाताई चिंचोले सदर सोहळ्यात उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांचा पुरस्कार व सन्मान मान्यवरांच्या हस्ते घोषित करण्यात आला. सदर पुरस्कार त्यांना संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध व परखड वक्तृत्वासाठी प्रख्यात असलेले प्राचार्य एन्. बी. चापे, मावळते अध्यक्ष ज्येष्ट कवि व समिक्षक मा. किरण डोंगरदिवे, सुप्रसिद्ध झेप संपादक मा. डी. एन्. जाधव, स्कॉटलंड यार्ड स्टुडंट्स ब्रॅंड ॲम्बेसेडर डॉ. संघर्ष सावळे, पि. इ. एस्. च्या डॉ.आंबेडकर कला महाविद्यालय, (औरंगाबाद ) छ.संभाजीनगर चे माजी प्राचार्य डॉ. हिंमतराव जाधव, ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रणेते ज्येष्ठ कवी साहित्यिक मा. कडूबा बनसोड, साहित्यिक क्षेत्रातील वैशिष्ठ्यपूर्ण आविष्कारासाठी अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. बबनराव महामुने, सामाजिक सेवाभावी कार्यास्तव अमेरिकेतील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान डॉ. डी. व्ही. खरात, ॲड. रेखाताई हणमंते, ज्येष्ठ कवयित्री मा. आशाताई डांगे, ज्येष्ठ समीक्षक विचारवंत मा. दैवत सावंत, ज्येष्ट कवि मा. सुनील उबाळे, सामाजिक कार्यकर्त्या तथा कवयित्री ॲड. वर्षा कंकाळ, ब. सा. संघ तथा केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे पदाधिकारी व या संमेलनाचे संयोजक मा. ज्ञानेश्वर बुधवत तसेच केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली चे महाराष्ट्र विशेष उपाध्यक्ष मा. रविंद्र सोनार, कें. मा. स. चा नुकताच संविधान गौरव पुरस्कार प्राप्त मा. विठ्ठल सपकाळ, मा. सुरेश अवसरमोल, मा. साहेबराव बोर्डे, ज्येष्ठ कवी साहित्यिक मा. रमेश पोतदार - चाळीसगाव, ज्येष्ठ कवयित्री मा. निर्मला पवार - चाळीसगाव तथा सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, लेखक, कवी, दिग्दर्शक, गीतकार, गायक,वादक हरहुन्नरी कलावंत व अंतर्राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासह विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त तथा सामाजिक समर्पित कार्यास्तव साऊथवेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, अध्यक्ष, बहुजन साहित्य संघ, चिखली यांच्यासह बहुतांश कवि, लेखक, साहित्यिक तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Post a Comment