लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड (बाजीराव गायकवाड ):-बामणी ते आलेगाव रस्त्याचे काम येत्या जून पर्यंत पूर्ण होईल. रुंदीकरणाबाबत वनविभाग व जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून रुंदीकरणाचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन बारूळ तालुका कंधार येथे दिनांक 30 एप्रिल रोजी आयोजित 'एक दिवस गावकऱ्यासोबत '(ग्राम दरबार) या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले .
ते पुढे म्हणाले, बारूळ ला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आपण जातीने लक्ष घालू व बारूळ येथील नाली बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश बैठकीत सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सुमित पाटील यांना दिले .तसेच स्मशानभूमी चा डीपी दोन दिवसात बसवण्याचे आदेश महावितरण चे सहाय्यक अभियंता श्री राऊत यांना दिले .
प्रास्ताविक एस पी जाधव यांनी करून 'एक दिवस गावकऱ्यासोबत' या उपक्रमाची माहिती दिली व गावकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सर्व खात्यांच्या प्रमुखांना व आ. प्रताप पाटील चिखलीकर यांना सादर केले .यावेळी आ. प्रताप पाटील यांनी मागण्याबाबत विभागनिहाय चर्चा करून तत्काळ अडचणी सोडवाव्यात असे आदेश दिले .
नंदनवन चे सरपंच गुरुनाथ पाटील यांनी विचार व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादीचे राज्य संघटक एड. मुक्तेश्वर धोंडगे ,माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर ,उपविभागीय अधिकारी सौ अरुणा संगेवार,तहसीलदार रामेश्वर गोरे, बांधकाम विभागाचे अभियंता सुमित पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील ,तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद केंद्रे कर ,पंचायत समितीचे कृषी अधिकारी गणेश यादव ,आगार प्रमुख अभय वाढवे ,कनिष्ठ अभियंता वाघ, विलास नरनाळीकर, सहकार अधिकारी पंडित ,इंजिनीयर देविदास बसवदे ,वीज वितरण कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राऊत, गटशिक्षणाधिकारी संजय येरमे ,नायब तहसीलदार विनोद पावडे, विस्तार अधिकारी शिवाजी पानपट्टे, वनपाल एस डी धोंडगे ,शालिनी वाघमारे ,सरपंच सौ जनाबाई वाघमारे ,भाजपा उपाध्यक्ष शंकरराव नाईक, सुधाकर पाटील कौशल्य, पोलीस स्टेशन उस्माननगर चे पोलीस निरीक्षक मुळीक ,सह कवठा व बहादरपुरा सर्कल मधील सरपंच, उपसरपंच ,पदाधिकारी ,गावकरी, पत्रकार उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन ग्रामविकास अधिकारी डॉ. व्ही. जी.आदमपूरकर यांनी केले.
---------------------------------
🪀 सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.lokneta.in/
Post a Comment