लोकनेते आ. बालाजी कल्याणकर यांचा आज वाढदिवस


लोकनेता न्युज नेटवर्क

नांदेड (संदीप वानखेडे) :- आजचा दिवस केवळ एका व्यक्तीचा वाढदिवस नसून, तो सामान्य माणसांच्या आशा-आकांक्षांचा, संघर्षाचा, कष्टाचा, आणि निःस्वार्थ लोकसेवेचा एक भव्य उत्सव आहे. हा दिवस साजरा होत आहे आपल्या उत्तर मतदारसंघाचे खरे लोकनेते, आपल्या सर्वांचे आपले आमदार आदरणीय श्री. बालाजी देवीदासराव कल्याणकर यांच्या जन्मदिनी. भाऊंची जन्मकथा हीच एक प्रेरणादायी गाथा आहे.

 १ जून १९८० रोजी माता सुभद्राबाई आणि वडील देवीदासराव यांच्या पोटी जन्मलेल्या बालाजी भाऊंनी लहान वयापासूनच कष्ट, जिद्द, आणि चिकाटी यांना आपल्या जीवनात मानाचे स्थान दिले. ग्रामीण भागातील साध्या कुटुंबातून उभा राहून, संपूर्ण उत्तर मतदारसंघाचा बुलंद आवाज बनवण्याचा प्रवास भाऊंनी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी आणि निष्ठेने पूर्ण केला.

भाऊंच्या शिक्षणाचा प्रवासही प्रेरणादायी आहे : 

१ ली ते ७ वी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरोडा (खु.), ८ वी ते १० वी – बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, बाराशिव, ११ वी ते १२ वी आणि बी.ए. – यशवंत महाविद्यालय, 

भाऊंच्या कुटुंबाची ओळख म्हणजेच संस्कार, कष्ट, आणि कर्तव्यनिष्ठा:

मधले बंधू श्री. राजेश देविदास कल्याणकर – राजेश ट्रेडर्स व सिमेंट व्यवसाय यशस्वी युवा उद्योजक थोरले बंधू श्री. एकनाथ देविदास कल्याणकर – कुटूंबाचा आधारस्तंभ यशस्वी उद्योजक, सर्वांत लहान, पण जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते 

भाऊंच्या राजकीय वाटचालीचा झंझावात: 

२०१२ – नगरसेवक म्हणून निवड

२०१४-१५ – विरोधी पक्षनेते म्हणून भक्कम भूमिका

२०१९ – पहिल्यांदा आमदार म्हणून निवड

२०२४ – पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करून भरघोस मतांनी दुसऱ्यांदा आमदार

भाऊंच्या कार्यकाळात ३५०० कोटी रुपयांचे विकासकामे, ही त्यांच्या लोकसेवेची ठसठशीत साक्ष आहे.

भाऊंच्या यशामागील खंबीर आधारस्तंभ – कुटुंब:

 पत्नी – सौ. संध्याताई बालाजी कल्याणकर, शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा

 पुत्र – सुहास बालाजी कल्याणकर, शिवालय उद्योग समूहाचे उपाध्यक्ष

कन्या – श्रुतिका बालाजी कल्याणकर, कुटुंबाचा अभिमान

भाऊ म्हणजे

गोरगरीबांचे कैवारी, सामान्यांच्या अडचणींना न्याय देणारे नेतृत्व जनतेच्या सुख-दुःखात कायम उपस्थित असलेले आधारवड, नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज, महाराष्ट्रातील तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

भाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा:

अभय आणि मनमिळावूपणा, निर्भीड नेतृत्व, लोकाभिमुखता, संवेदनशीलता आणि सहनशीलता, कुटुंबाचा त्रिवेणी संगमासारखा प्रेमळ स्वभाव भाऊंचा वाढदिवस म्हणजेच "संघर्षाचा उत्सव – लोकसेवेचा सोहळा."भाऊंच्या वाढदिवसानिमित्त मी श्री बालाजी भगवान चरणी एकच प्रार्थना करतो:भाऊंना उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो.त्यांचे नेतृत्व उत्तर मतदारसंघाला विकासाच्या नवनवीन शिखरांवर पोहोचवो. नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा लाभो.भाऊ म्हणजे एक नुसते नाव नव्हे, तर एक जबाबदारी, एक कर्तव्य, एक शपथ भाऊंचा आवाज हे जनतेचे हक्काचे रक्षण करणारे बळ आहे आणि त्यांच्या नेतृत्वात उत्तर मतदारसंघाची प्रगती ही आपलीच प्रगती आहे.पुनश्च एकदा भाऊंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

-------------------------------------

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.lokneta.in/

0/Post a Comment/Comments