पॅथर जयदीप बगाडे दौंड यांच्या प्रयत्नांना यश ; दौंड नगर परिषदेला मिळाले पुर्ण वेळ मुख्याधिकारी

दैनिक लोकनेता इफेक्ट

लोकनेता न्यूज नेटवर्क

दौंड (प्रतिनिधी) :- दौंड नगर परिषदेला पुर्ण वेळ मुख्याधिकारी मिळावा म्हणून पॅथर जयदीप बगाडे अध्यक्ष न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. पुर्ण वेळ मुख्याधिकारी न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तशी बातमी दि.१३ जून २०२५ रोजी दैनिक लोकनेता मध्ये प्रसिध्द झाली होती आणि आज त्याचा इफेक्ट नगर विकास विभागाचे अवर सचिव अ.का.लककस यांनी दिनांक १३ जून २०२५ रोजी आदेश काढून श्री.अवधूत तावडे यांनची मुख्याधिकारी, दौंड नगर परिषद, जि.पूणे येथे नियुक्तीचे आदेश काढून दि.१६ जून २०२५ रोजी रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. श्री अवधूत तावडे हे, उपायुक्त म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे कार्यरत होते. दौंड शहरातील सर्वच स्तरातून, नागरिकांन मधून पॅथर जयदीप बगाडे यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

------------------------------------- 

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.lokneta.in/

0/Post a Comment/Comments