हवेलीlसंतोष कदम :– कांगठी येथील युवा साहित्यिक कवी मा.धम्मोदय उर्फ उदयनराजे वाघमारे हा वयाच्या १६ व्या वर्षापासून कविता,लेख,लेखन करतोय. बारावीला असताना युवा महोत्सव कार्यक्रमात हुतात्मा पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे कवी संमेलनात सहभाग घेतला "सृजन"या भिंतीपत्रकामधे "असं माझा महाविद्यालय" ही कविता प्रकाशित,कविता जन्मते तेव्हा या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात "कर्तव्य बजावताना" तर रेशीम बंध या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात "भाऊ बहिणीच नातं"दैनिक साहित्यतेज,साप्ताहिक प्रकाश वाटा,आम्ही मुंबईकर,साप्ताहिक दिव्यांग विश्व टाइम्स,साप्ताहिक "प्रभात वार्ता" इत्यादी वर्तमान पत्रात कविता लेख कथा तर "राष्ट्रमाता रमाई आंबेडकर जीवन चरित्र
या पुस्तक प्रकाशित तर गडचिरोली,चंद्रपूर,रत्नागिरी,नांदेड व महाविद्यालय, या सारख्या ठिकाणावर राज्यस्तरीय कवी संमेलनात कविता सादर केले अनेक पुरस्कार प्राप्त अध्यापक महाविद्यालय नायगांव बा येथील बी. एड. द्वितीय वर्षात शिक्षण शिकत आहे.०३ जुलै २०२५ रोजी आकाशवाणी रेडिओ नांदेड केंद्रावर "लोकशाहीर साहित्य सम्राट"अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित "परिवर्तनाचं बीज पेरलेला साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर काव्य वाचन तथा व्याख्यान सादरीकरण करण्यात आले १८ जुलै २०२५ रोजी शनिवारी १० :४५ मिनिटाला आकाशवाणी रेडिओ केंद्रावरून प्रसारित झालेलं आहे. नायगांव बा एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि नांदेड लोकसभेचे लोकप्रिय सन्माननीय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण व संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.केशवरावजी चव्हाण यांच्या वतीने अध्यापक महाविद्यालय नायगांव बा येथील प्राचार्य डॉ मा.माने सर,प्रा डॉ कोनापुरे सर,प्रा.डॉ. छाया सप्रे मॅडम,प्रा.पवार सर,प्रा.हंबर्डे सर,प्रा. पांचाळ सर, प्रा.गायकवाड सर, मा.मोरे सर , बोंडले मामा सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मा.धम्मोदय उर्फ उदयनराजे वाघमारे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
________________________

Post a Comment