लोकनेता न्युज नेटवर्क
शिरवळ :-सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष उदयदादा कबुले यांचा अभिष्टचिंतन सोहळा गेली दशकभर उदयदादा कबुले हे नाव खंडाळा तालुक्याच्या सत्तापटलावर या ना त्या कारणामुळे गाजत आहे. आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणारा हा लोकनेता दशक पूर्णपणे खंडाळा तालुक्याच्या राजकारणाचा आणि सत्ता कारणाचा एकमेव केंद्रबिंदू ठरत आहे. उदयदादा खंडाळा तालुक्यातील लोकप्रिय नेते आहेत. शिरवळचे उपसरपंच ते सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा राहिला आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मकरंद आबा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून उदयदादा सातारा जिल्ह्यामध्ये ओळखले जातात. एक धुरंधर नेता म्हणून त्यांचा सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे हजरजबाबीपणा, जबरदस्त वक्तृत्व, एखादा विषय मांडण्याची हातोटी, प्रचंड जनसंपर्क याबरोबरच प्रत्येक क्षणी विरोधकांच्या डावाला प्रतिडाव टाकण्याची असणारी त्यांची चाणाक्ष बुद्धी.
शिरवळचे उपसरपंच असताना त्यांनी उभा केलेला विकास कामाचा डोंगर शिरवळ मध्ये आल्यानंतर अनेकांना दिसून येतो. राजकारणात केवळ कर्तबगारीने नव्हे, तर जनतेच्या मनाशी जोडणाऱ्या संवादशैलीनेही आपली छाप पाडणारे दादा हे एक अनोखे व्यक्तिमत्व आहेत. कॅबिनेट मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासारख्या हिमालयाप्रमाणे उत्तुंग नेतृत्वाच्या छायेत उभं राहत स्वतःचं ठसठशीत अस्तित्व निर्माण करणे हे सहजशक्य नसतं पण उदयदादांनी हे करून दाखवलं. दादांमध्ये आपलेपणा आणि जनमानसाला भिडणारा ठामपणा आढळतो. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अनेक धडाकेबाज निर्णय दादांनी घेतले.
दादा म्हणजे गती, दादा म्हणजे प्रगती, दादा म्हणजे विकास
या घोषणा कार्यकर्त्यांच्या तोंडून नेहमी ऐकायला मिळतात, पण त्या घोषवाक्यांमागे वास्तवाचे मोठे अधिष्ठान आहे. उदयदादा म्हणजे कामाचा ध्यास घेतलेला नेता. दादा हे केवळ एक प्रशासक नाहीत तर ते माणसांशी थेट बोलणारे, भिडणारे आणि भिडवणारे नेते आहेत.
शिरवळच्या सार्वजनिक जीवनाच्या प्रारंभातच या लोकनेतेच्या व्यक्तिमत्वात खंडाळ्याच्या भावी नेतृत्वाचे कर्तृत्व दडले होते आणि काळाच्या ओघात ते तंतोतंत खरे ठरलेय. उदय दादांचे कर्तृत्व सर्वस्पर्शी, प्रेरक नि हवेहवेसे वाटणारे आहे.
एखादं सामाजिक अवघड काम होत नसेल तर ते काम यशस्वीपणे पार पाडल्याचे अनेक वेळा दादांनी सिद्ध केले आहे. खंडाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये उदयदादांचे मोठे वलय असून राजकारणातला जादूगर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आदेशशेठ भापकर, उमेश गिरमे व त्यांचे मित्र परिवार यांचे विश्वासू असलेले दादा हे शिरवळ तसेच खंडाळा तालुक्याच्या राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असून दादांचे सामाजिक दायित्व खूप मोठे आहे. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये पंचायत समिती असो की तहसील कार्यालय या ठिकाणी नागरिकांची कामे करून घेण्यासाठी दादा सदैव प्रयत्नशील असतात. खंडाळा तालुक्यामध्ये त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग असून त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. सदैव कार्यकर्ते आणि मित्रांच्या गराड्यात असणारी दादांची नाळ सर्वसामान्यांशी जुळलेली आहे. सुस्वभावी व नम्र असल्यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दादा सर्वांना आपलेसे वाटतात. आजही प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वांना मदतीचा हात देणाऱ्या उदयदादांचा जनसेवेचा यज्ञ हा अखंडपणे सुरू आहे.
अशा या लोकप्रिय लोकनेत्यास अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शब्दांकन :
विजय जगताप
बी.ए.बी.एड., एम.बी.ए.
सचिव..... महाराष्ट्र पत्रकार संघ पुणे जिल्हा
.________________________

Post a Comment