लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड | बाजीराव पाटील कळकेकर :- करेगाव फाटा ता.धर्माबाद जिल्हा नांदेड येथे बेमुदत साखळी उपोषणास भेट देऊन शेतकरी नेते मा.मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी कारेगांव फाटा येथे गोदावरी काठीच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे बॅकवॉटरमुळे अतोनात नुकसान होत आहे व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे देखील पावसामुळे अतोनात नुकसान होऊन सुद्धा त्यांना विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांचा पिक विमा मिळावाच..... आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अप्पर पैनगंगेचे कॅनॉलचे कामे पूर्ण करणे व उमरी आणि धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नव संजीवनी निर्माण करून देणे यासोबतच गोदावरी दुतर्फा लाईटची व्यवस्था करणे कारण लाईट अभावी गोदावरी भरून असून सुद्धा तेथील शेतकऱ्यास पाणी उपसा करता येत नाहीये, वाघाळा डॅम चे काम लवकरात लवकर मंजूर करून घेऊन मार्गी लावणे तसेच शेतकऱ्यांना पांदण रस्ते देखील करून दिले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी आज रोजी स्वतः जाऊन उपोषणामध्ये सहभाग घेतला मी देखील शेतकऱ्यांचाच मुलगा आहे मला शेतकऱ्याची नुकसानाची जाणीव आहे यासाठी मी सदैव शेतकऱ्यांसोबत आहे.
________________________
Post a Comment