जालना :- "मराठवाडा मुक्ती संग्राम दिन " राजकुंवर महाविद्यालय वाघरुळ,येथे साजरा करण्यात आला. राजकुंवर महाविद्यालय वाघरुळ (ज) ता. जि. जालना येथे १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. मुख्य ध्वोजारोहन सकाळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राजेंद्र जायभाये यांच्या हस्ते करण्यात आले. एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रा. चंद्रमुनी जोगदंड, प्रा. प्रवीण गाडेकर, प्रा. समाधान सरोदे, प्रा. अरुण गिते, प्रा. कु. सर्द्धा सतकर, प्रा. सौ. रेणुका रुपणार, प्रा. सौ. रेणुका चित्राल, श्री. गजानन जोगदंड, श्री. संतोष जाधव, श्री. सुनील शिंदे, श्री. पवन जोगदंड आदी कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment