विचाराचं सोनं लुटण्यासाठी भगवान भक्ती गडावर लाखोच्या संख्येने उपस्थित रहा - नवनाथ शिराळे


लोकनेता न्युज नेटवर्क

बिड (प्रतिनिधी) बीड :- महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान भक्ती गडावर संपन्न होणाऱ्या दसरा मेळाव्यात विचाराचे सोनं लुटण्यासाठी जिल्ह्यातील भगवानबाबावर  श्रद्धा असणाऱ्या व पंकजाताई मुंडे साहेबांवर प्रेम असणाऱ्या जनतेने मोठ्या प्रमाणात  भगवान भक्ती गडावर उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आव्हान नवनाथ शिराळे यांनी केले आहे.बीड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशोक  लोढा यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत  बोलत असताना नवनाथ शिराळे यांनी असे आवाहन केले आहे. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी  आयोजित केलेल्या बैठकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते देविदास नागरगोजे सलीम जहांगीर मीराताई गांजले  गणेश लांडे अजय सवाई जयश्रीताई मुंडे शांतिनाथ डोरले डॉ. अभय वनवे विजय चौधरी संध्याकाळी राजपूत प्रीत  कुकडेच्या इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी देविदास नागरगोजे,  अशोक लोढा, अजय सवयी, सलीम जहांगीर, इरशाद शेख यांनी बैठकीस मार्गदर्शन केले . बैठकीत पुढे बोलताना नवनाथ शिराळे असे म्हणाले की भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावा हा 18 पगड जातीचा दसरा मेळावा असून मुंडे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा पंकजाताई च्या रूपाने जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जनतेला संघर्ष करण्याची प्रेरणा देत असून या मेळाव्याच्या माध्यमातून विचाराचा सोनं लुटलं जातं तेव्हा बीड जिल्ह्यातील तमाम जनतेने मोठ्या प्रमाणात या दसरा मेळाव्यात सहभागी होऊन भगवान बाबांचे आशीर्वाद घ्यावेत अशा प्रकारचे आव्हान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ आण्णा शिराळे सोबत यावेळी उपस्थित सलीम जहांगीर अजय सवय शांतिनाथ डोरले बाबुराव परळकर देविदास नागरगोजे सर गणेश लांडे गिरी साहेब ननवरे साहेब डॉक्टर अभय वनवे मीराबाई गांधले संध्या राजपूत जयश्री मुंडे प्रीत कुकडेच्या सौ देशपांडे ताई नागरगोजे साहेब संभाजी सुर्वे  गवळी साहेब इरशाद भाई इत्यादी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

------------------------------------------

🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

0/Post a Comment/Comments