लोकनेता न्युज नेटवर्क
देगलूर (लक्ष्मी मनधरणे) :- परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तसेच दिवाळी सणानिमित्त विद्यालयात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर,विस्तार सेवाकार्य प्रमुख भानुदास शेळके तसेच गट साधन केंद्र येथील विषयतज्ञ साबणे सर, परकंठे सर यांच्या हस्ते भारत माता व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आले. या प्रसंगी भानुदास शेळके सरांनी गरीब लोकांना दिवाळी फराळ वाटप करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी निधी गोळा केले व सर्व शिक्षकांच्या सहकाऱ्यांनी खाऊ संग्रहित करण्यात आले असे सांगितले.
उपस्थित सर्व मान्यवरांना विद्यार्थ्यांनी कागदापासून बनवलेले दिवाळी भेट कार्ड देऊन त्यांचे स्वागत करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आले. तसेच मुलांनी माती पासून बनवलेल्या पणत्यांचे सर्व शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले.
यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित वाचन केले व कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
------------------------------------------
🪀 सर्व महत्त्वाच्या बातम्या मिळवा WhatsApp वर लोकनेता न्यूज ला जॉईन व्हा व शेअर करायला विसरू नका👉 https://lokneta.in/

Post a Comment